शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीत भाजपाची मुस्कटदाबी सदस्यांचा आरोप : सत्ताधार्‍यांचा केला निषेध; सभेत बोलण्यावरून खडाजंगी

By admin | Updated: May 6, 2016 22:11 IST

जळगाव : स्थायी समितीच्या सभेत बोलण्यास सत्ताधार्‍यांकडून भाजपाची मुस्कटदाबी होत असून भाजपाच्या सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण व सदस्यांनी सभेत केला. तसेच सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना सत्ताधार्‍यांच्या या भूमिकेचा त्यांनी निषेधही केला. सभेत ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे व खाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांच्यात या विषयावरून शाब्दिक चकमकही झाली.

जळगाव : स्थायी समितीच्या सभेत बोलण्यास सत्ताधार्‍यांकडून भाजपाची मुस्कटदाबी होत असून भाजपाच्या सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण व सदस्यांनी सभेत केला. तसेच सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना सत्ताधार्‍यांच्या या भूमिकेचा त्यांनी निषेधही केला. सभेत ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे व खाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांच्यात या विषयावरून शाब्दिक चकमकही झाली.
मनपातील जन्म-मृत्यू विभागामध्ये संगणकाचे ज्ञान असलेले व संगणकाद्वारे दाखले तयार करण्यासाठी तुळशीराम राठोड यास मानधनावर नियुक्ती देण्याबाबतच्या प्रशासनाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपाच्या ज्योती चव्हाण यांनी लेखापरीक्षकांनी या प्रस्तावाची टिपणी चांगली लिहिली असल्याचे सांगितले. मात्र तरीही विषयाला मात्र भाजपाचा विरोध असल्याचे सांगत विषय बहुमताने घेण्याची सूचना केलीे. तर पृथ्वीराज सोनवणे यांनी त्यांच्या प्रभागात व्हॉल्वमन म्हणून अनेक वर्षांपासून काम करणार्‍या व्यक्तीसही मनपाने मानधनावर घ्यावे अशी मागणी केली. मात्र पाणीपुरवठ्यात भरपूर कर्मचारी असल्याने हा विषय घेता येणार नाही, असे सभापतींनी स्पष्ट केले. मात्र भाजपाकडून त्याच विषयावर मत मांडण्याचा प्रयत्न झाल्याने खाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांनी विषय बहुमताने मंजूर झाल्यावर त्याबाबत मत मांडण्याचा विषयच येत नाही. तसेच लेखापरीक्षकांनी कर्मचारी अधिक असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. मग हा विषय मांडण्यापूर्वी अभियंता, उपायुक्त, आयुक्त अथवा स्थायी समिती सभापतींशी चर्चा करायला हवी होती. त्यावर पृथ्वराज सोनवणे यांनी तुमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे विषय मंजूर करायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. पाण्याची समस्या निर्माण व्हायला नको, असे बजावले. तर ज्योती चव्हाण यांनी आम्हाला कोणाशी चर्चा करायची गरज नाही. तुम्ही असे सांगितलेच कसे? असा सवाल केला. त्यामुळे त्यांच्यात व गणेश सोनवणे यांच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतरही आयत्यावेळेत दूध केंद्रास मंजुरीचा विषय सत्ताधार्‍यांनी मंजूर केला. मात्र पृथ्वीराज सोनवणे यांनी आयत्यावेळेचा विषय मांडण्याचा प्रयत्न करताच ही महासभा नाही, असे सांगत सभा संपल्याचे जाहीर केले.
-------
भाजपा नेत्याच्या नातलगाच्या दूधकेंद्रास मंजुरी
मनपाकडून गेल्या चार-पाच वर्षांपासून दूध केंद्रांच्या प्रस्तावांना मंजुरी देणे बंद करण्यात आले होते. मात्र भाजपातील एका नेत्याच्या नातलगाच्या मिनाक्षी संजय पाटील यांच्या दूधकेंद्राच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचा विषय सत्ताधार्‍यांनी स्थायी समिती सभेत तातडीने मंजूर केला. विशेष म्हणजे भाजपाच्याच सदस्यांनी त्यास विरोध दर्शविला. सभापतींनी भाजपाच्याच माणसाचा प्रस्ताव आहे. एकमताने मंजूर करायचा की विरोध आहे? अशी विचारणाही केली. त्यावर भाजपाच्या सदस्यांनी विरोध दर्शवित बहुमताने घ्या, अशी भूमिका घेतली.
-------
सत्ताधार्‍यांचा निषेध
सभा आटोपल्यावर ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे व सदस्यांनी सत्ताधार्‍यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजपाला बोलू दिले जात नसल्याचा आरोप करीत सत्ताधार्‍यांचा निषेध केला.