शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

भाजपातील सत्तासंघर्ष उघड्यावर

By admin | Updated: August 28, 2014 02:23 IST

राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याच्या कथित गैरवर्तनाच्या बातम्या आणि कथितरीत्या या बातम्या पसरविणाऱ्या आपल्याच वरिष्ठ सहकाऱ्याविरुद्ध राजनाथसिंह यांनी पक्षाध्यक्षांकडे केलेली तक्रार

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याच्या कथित गैरवर्तनाच्या बातम्या आणि कथितरीत्या या बातम्या पसरविणाऱ्या आपल्याच वरिष्ठ सहकाऱ्याविरुद्ध राजनाथसिंह यांनी पक्षाध्यक्षांकडे केलेली तक्रार या कुरघोडीवरून सत्ताधारी भाजपातील सत्तासंघर्ष उघड झाला आहे़ या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांत बातम्या येऊन गेल्याच्या महिनाभरानंतर राजनाथसिंह यांनी हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दरबारात न्यावे, यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत़या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधल्यावर पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी मीडियातील वृत्ताबाबत आश्चर्य व्यक्त केले, असे राजनाथसिंह यांनी बुधवारी सांगितले़ आपल्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांसोबत बोलताना राजनाथसिंह यांनी त्यांच्या व मुलाबाबतच्या बातम्या निराधार ठरवल्या़ यानंतर काहीच मिनिटांत पंतप्रधान कार्यालयाने याबाबत खुलासा केला़ गृहमंत्र्यांच्या मुलाबाबतचे वृत्त आणि यात पंतप्रधानांचा उल्लेख निराधार असून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले़ पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही एक पत्रक प्रसिद्धीस देऊन राजनाथसिंह आणि त्यांच्या मुलाच्या पक्षकार्यातील योगदानाची प्रशंसा केली़ राजनाथसिंहांचे पुत्र पंकज हे उत्तर प्रदेशात भाजपाचे सरचिटणीस आहेत आणि गेल्या १० वर्षांत एक निष्ठावान कार्यकर्त्याच्या रूपात विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, असे शहांनी म्हटले आहे़ आमच्या सर्व मंत्र्यांचे आचरण उच्चकोटीचे असून त्यांच्या निष्ठेबाबत कुठलाही संशय नाही़ प्रसार माध्यमांनी भ्रामक आणि निराधार वृत्त प्रसारित करणे थांबवावे, असेही त्यांनी म्हटले आहे़ येत्या १३ सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील नोएडात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अमित शहा यांनी राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याला तिकीट नाकारले आहे़ यामुळे राजनाथसिंह कुठेतरी दुखावले होते़ पंकज याला तिकीट नाकारून भाजपाने नोएडातून ६२ वर्षांच्या उद्योजिका विमला बाथम यांना उमेदवारी जाहीर केली़ राजनाथसिंहांना हे दुखावणारे होते़ अर्थात राजनाथसिंह यांनी पंकजच्या कथित गैरवर्तनाच्या प्रकरणात त्याला तिकीट नाकारण्याचा मुद्दा येऊ दिला नाही़ तो त्यांनी अतिशय सावधगिरीने टाळला़ राजनाथसिंह वादात अडकणारे नितीन गडकरी यांच्यानंतरचे दुसरे ज्येष्ठ मंत्री आहेत़ गडकरींच्या निवासस्थानी हेरगिरी करणारी उपकरणे सापडल्याचे वृत्त येताच ते वादात सापडले होते़ पुढे हे प्रकरण निस्तरायला त्यांना व पक्षाला अनेक प्रयत्न करावे लागले होते़ येनकेनप्रकारेण सरकारला १०० दिवस पूर्ण होण्याच्या आनंदावर विरजण पडू नये, असे रालोआ सरकारचे प्रयत्न आहेत़