शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायसंस्थेचे भाजपकडून राजकारण, काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 05:48 IST

ए. एस. कुरेशी यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यासंदर्भात कॉलेजियने केलेल्या शिफारशीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल काँग्रेसने भाजपवर टीका करीत सत्तारुढ भाजप न्यायसंस्थेत राजकारण करीत असल्याचा आरोप केला.

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांनी हटविण्यात निष्क्रियता आणि न्यायाधीश ए. एस. कुरेशी यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यासंदर्भात कॉलेजियने केलेल्या शिफारशीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल काँग्रेसने भाजपवर टीका करीत सत्तारुढ भाजप न्यायसंस्थेत राजकारण करीत असल्याचा आरोप केला.अनेक महिने चाललेल्या तीन सदस्यांच्या अंतर्गत चौकशीत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शुक्ला गैरवर्तनप्रकरणी दोषी आढळल्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्या. शुक्ला यांना हटविण्याची कार्यवाही सुरू करण्याचे कळविले होते. न्या. कुरेशी यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीकडे दुर्लक्ष करून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीशपदी दुसऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती केली.सोयीस्कर मौन हाच पंतप्रधानांसाठी शब्द आहे. सर्वोच्च न्यायालयाने १८ महिन्यांपूर्वी न्या. एस. एन. शुक्ला यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची शिफारस केली होती. या मुद्यावर जाणीवपूर्वक निष्क्रिय राहत भाजप सरकार न्यायसंस्थेचा निष्पक्षपणाचा पायाच निष्क्रिय करण्याच्या उद्देशाने पक्षपातीपणाचे राजकारण करीत आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टष्ट्वीट केले आहे.न्या. शुक्ला यांच्याविरुद्ध महाभियोगाची कार्यवाही सुरू करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने केलेली विनंती डावलून आणि न्या. कुरेशी यांना मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्याच्या शिफारशीकडे दुर्लक्ष करणे, यातून न्यायसंस्थेचे दूरनियंत्रण हाती घेण्याच्या हेतूने राजकारण करण्याचा भाजपचा कट दिसतो.सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १० मे रोजी न्या. कुरेशी यांची ज्येष्ठतेनुसार मध्य प्रदेशचे मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्याची शिफारस केली होती.

टॅग्स :Courtन्यायालय