नवी दिल्ली : २०१४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ७१४ कोटी, तर काँग्रेसने त्यापाठोपाठ ५१६ कोटी रुपये खर्च केले. निवडणूक आयोगाने २०१४ ची लोकसभा निवडणूक, तसेच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीवर विविध राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या खर्चाची आकडेवारी जारी केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहूजन समाज पार्टीने अनुक्रमे ५१ आणि ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला.भाजपाने केलेला खर्च ७१४ कोटी २८ लाख ५७ हजार ८१३ रुपये, तर काँग्रेसने केलेला खर्च ५१६ कोटी, २ लाख ३६ हजार ७८५ रुपये एवढा आहे.निवडणूक आयोगाने खर्चासंबंधी तपशील देण्यासाठी आॅगस्ट २०१४ पर्यंत मुदत दिली असताना या दोन्ही पक्षांनी अलीकडेच खर्चाची आकडेवारी दिली. आयोगाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोन पक्षांसह काही प्रादेशिक पक्षांना नोटीस बजावल्या होत्या. काँग्रेसने २२ डिसेंबर २०१४ रोजी, तर भारतीय जनता पार्टीने आपल्या खर्चाचा तपशील १२ जानेवारी १५ रोजी सादर केल्याची माहिती आयोगाने दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजपकडून निवडणुकीवर सर्वाधिक खर्च
By admin | Updated: January 17, 2015 02:30 IST