शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भाजपाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: April 27, 2017 02:18 IST

भाजपाने दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांमध्ये १८१ जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा जोरदार यश मिळवले. भाजपाच्या

नवी दिल्ली : भाजपाने दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांमध्ये १८१ जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा जोरदार यश मिळवले. भाजपाच्या विजयाला मतदान यंत्रांतील छेडछाड कारणीभूत असते असा वारंवार आरोप करणाऱ्या आम आदमी पक्षाला अवघ्या ४६ तर फक्त ३० जागा जिंकल्यामुळे काँग्रेसला तिसरे स्थान मिळाले. या पराभवाचे खापर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा मतदान यंत्रांवर फोडले आहे. तर काँगे्रसचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष अजय माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला. एकूण २७० जागा असलेल्या या तिन्ही महानगरपालिका राखणे भाजपासाठी फार महत्त्वाच्या होत्या. २०१५मध्ये विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर ‘आप’ला महापालिकाही जिंकण्याचे वेध लागले होते. भाजपासमोर आप साफ झाली. काँग्रेसच्या पुन्हा उभे राहण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या. केजरीवाल यांनी तिन्ही महानगरपालिकांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा पराभव केजरीवाल सरकारच्याविरोधात दिलेले मत असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. नरेंद्र मोदी यांनी मानले आभारभाजपावर पुन्हा विश्वास टाकल्याबद्दल व दिल्ली महानगरपालिका निवडणुकींतील जोरदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील मतदारांचे आभार मानले आहेत. भाजपावर विश्वास टाकल्याबद्दल मी दिल्लीच्या लोकांचा कृतज्ञ आहे, असे मोदी यांनी म्हटले.बहुतेक मतदान यंत्रे ही चुकीच्या पद्धतीने काम करीत होती. ‘आप’ने दिल्लीत शिक्षण आणि आरोग्यासाठी एवढे काम केल्यानंतर मतदार भाजपाकडे जाणे शक्य नाही. - आशुतोष, ‘आप’चे नेते कॉँग्रेसमध्ये परस्परांवर आरोपांची राळ उडवली जात आहे. मोठ्या पराभवाला माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी माकन यांना थेट जबाबदार धरले आहे.