शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ वैधानिक मंडळाच्या अध्यक्षपदावर भाजपचा डोळा

By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST

विदर्भ वैधानिक मंडळाच्या अध्यक्षपदावर भाजपचा डोळा - सेनेचा जोर पडतोय कमजोर : अध्यक्ष निवडीची परंपरा भंगणार नागपूर : विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पहिल्यांदाच अध्यक्ष निवडीची परंपरा भंगणार असल्याची चिन्हे आहेत. हे मंडळ मुख्यमंत्र्यांच्या जिव्हाळ्याचे असल्याने, यावेळी भाजपमधील अभ्यासू व्यक्तिची वर्णी ...


विदर्भ वैधानिक मंडळाच्या अध्यक्षपदावर भाजपचा डोळा
- सेनेचा जोर पडतोय कमजोर : अध्यक्ष निवडीची परंपरा भंगणार
नागपूर : विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पहिल्यांदाच अध्यक्ष निवडीची परंपरा भंगणार असल्याची चिन्हे आहेत. हे मंडळ मुख्यमंत्र्यांच्या जिव्हाळ्याचे असल्याने, यावेळी भाजपमधील अभ्यासू व्यक्तिची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विदर्भात भाजपाच्या तुलनेत सेनेकडे अल्पबळ असल्याने, सेनेचा जोर कमी पडतो आहे. तर भाजपाच्या फळीतील दावेदाराचा दावा अधिक मजबूत होत आहे.
अध्यक्षपदावरून प्रकाश डहाके पायउतार झाल्यानंतर हे पद दीड वर्षांपासून रिक्तच आहे. हे मंडळ बरखास्त होईल, अशी भीती व्यक्त होत असताना, मुख्यमंत्र्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने, २०२० पर्यंत मंडळाला जीवनदान मिळाले. मुख्यमंत्र्यांनी नवीन सदस्यांची नियुक्ती करताना तरुणांना संधी दिली. शिवाय मंडळाच्या नावातून वैधानिक काढून विदर्भ विकास मंडळ ही नवी ओळख दिली. आता मंडळावर फक्त अध्यक्षाचीच निवड व्हायची आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यामुळे नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या हालचालींनी मंत्रालयात वेग धरला आहे. परंपरेनुसार मंुख्यमंत्री ज्या पक्षाचा असतो, त्या पक्षासोबत सत्तेत असलेल्या मित्रपक्षाला या मंडळाचे अध्य क्षपद दिले जाते. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद होते तर राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, तुकाराम बिडकर, प्रकाश डहाके यांना या मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. यावेळी मात्र ही परंपरा भंगणार असल्याचे चित्र आहे. या पदासाठी शिवसेनेची दावेदारी कमजोर पडते आहे. विदर्भात शिवसेनेचे केवळ चार आमदार आहे. त्यातही एकाला राज्यमंत्रिपदाचा मान मिळाला आहे. तुलनेत भाजपामधून उघडपणे दावेदारी होत नसली तरी, इच्छुकांची भरपूर मांदियाळी आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, आपापल्या जवळच्यांना हाताशी धरले आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, अशा नाराजांचीही संख्या बरीच आहे.
मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदाचा निवडीचा निर्णय प्रतिष्ठेचा केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री आमदार असताना विदर्भ विकास मंडळाने केलेल्या अभ्यासाचे दाखले देत, सभागृहात सत्ताधार्‍यांची त्रेधा तिरपट उडवायचे. येथे सूज्ञ, अभ्यासू आणि विदर्भातील समस्यांची जाण असणाराच अध्यक्ष त्यांना हवा आहे. त्यामुळेच अध्यक्षपदाची नियुक्ती प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पूर्व विदर्भातील असल्याने हे पद पश्चिम विदर्भात जाईल, यावरही साशंकता आहे. कारण पूर्व विदर्भातील काही नाराज दिग्गजांनी अध्यक्षपदावर दावेदारीचा सूर आवळला आहे. सोबतच पश्चिम विदर्भात नव्याने येऊन, भाजपला बळ देणारे, मंत्रिपदही भुषविणार्‍या नेत्याचीही मर्जी मुख्यमंत्र्यांना सांभाळायची आहे. मुख्यमंत्री ही आव्हाने सहज पेलतील आणि ऑगस्ट महिन्यात अध्यक्ष पदावर नियुक्ती करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.