शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

वाराणशीत भाजपाने गाठले उच्छाद, उन्मादाचे टोक

By admin | Updated: May 9, 2014 01:07 IST

निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या सभेला आणि कार्यक्रमाला परवानगी दिल्यानंतरही देशवासियांना खोटी माहिती देऊन भारतीय जनता पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांनी आज वाराणशीत अक्षरश: उच्छाद मांडला.

गजानन जानभोर -

वाराणशी - निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या सभेला आणि कार्यक्रमाला परवानगी दिल्यानंतरही देशवासियांना खोटी माहिती देऊन भारतीय जनता पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांनी आज वाराणशीत अक्षरश: उच्छाद मांडला. भाजपा कार्यकर्त्यांचा हा उन्माद किळसवाणा आणि वाराणशीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि अमित शाह हे स्वत: कार्यकर्त्यांना भडकावित होते. शहरात कलम १४४ लागले असताना प्रशासनाची परवानगी न घेता बनारस हिंदु विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर या नेत्यांनी सकाळपासून धरणे देण्यास सुरूवात केली. अचानक सुरू झालेल्या या तमाशामुळे रस्ते जाम झाले. वाहतुकीची कोंडी झाली आणि विद्यापीठात परीक्षेला येणार्‍या विद्यार्थ्यांचे हाल झाले. सत्याग्रहाच्या नावावर सुरु झालेली असत्याग्रहाची ही ड्रामेबाजी सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर अवघ्या दोन तासांत गुंडाळावी लागली. या तमाश्यातून काहीच साध्य झाले नाही मग हा स्टंट कशासाठी? असा सवाल या सांस्कृतिक नगरीने आज विचारला खरा पण या प्रश्नाचे उत्तर उन्माद चढलेल्या भाजपा कार्यकर्त्यांजवळ नव्हते. संध्याकाळी झालेल्या मोदींच्या रोडशो मधूनही हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. इथे मोदींसाठी हळुहळू अनुकुल वातावरण निर्माण होत असताना ही ड्रामेबाजी करण्याची गरजच नव्हती, अशी खंत येथील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जेटली- शाह यांच्यासोबत असलेले भाजपा कार्यकर्ते एवढे चवताळले होते की, या आंदोलनादरम्यान रस्त्याने जात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या महिला उमेदवारालाही त्यांनी मारहाण केली. दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने धरणे दिल्यानंतर त्याला अराजकता म्हणून टीका करणार्‍या भाजपा नेत्यांनी आज येथे उन्मादाचे टोक गाठले. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते खोटे बोलतात, कुठल्याही प्रकरणाचा बाऊ करतात, ही गोष्ट आता नवी नाही. पण जेटली, शाह यांनी खोटारडेपणाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाची निष्कारण बदनामी केली. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर दुपारी अनेक गंभीर बाबी समोर आल्यात. नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या पाचपैकी चार कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने आधीच परवानगी दिली होती. यात गंगा आरतीचाही समावेश होता. फक्त बेनियाबाग येथील जाहीर सभेला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी दिली नाही. येथील सभेला परवानगी नाकारताना प्रशासनाने भाजपला दुसर्‍या ठिकाणी सभा घेण्यास सुचविले. बेनियाबाग हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. १९९१ मध्ये भाजपा उमेदवार श्रीशचंद्र दीक्षित यांच्या प्रचारार्थ भाजपा नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या काही मिनिटांपूर्वी समाजकंटकांनी मंचावर बॉम्ब फेकले होते. सभेला जात असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या ताफ्यावर घरांच्या छतावरून दगडही मारण्यात आले होते. हा इतिहास असल्याने मोदींच्या सभेला कुठलाही धोका होऊ नये, या हेतूने प्रशासनाने ही परवानगी दिली नाही. पण या गोष्टीचे भाजपाने भांडवल केले. प्रशासनाने दुसर्‍या ठिकाणी सभा घेण्याची परवानगी दिल्यानंतर सभेच्या तयारीला ३६ तासांचा अवधी होता. परंतु, भाजपाला ती सभा घ्यायचीच नव्हती. त्या सभेमुळे मिळणार्‍या फायद्यापेक्षा या नौटंकीमुळे जास्त फायदा होईल, हे नेत्यांचे मनसूबे होते. परंतु ते फारसे फलद्रुप झाले नाहीत. अस्सीघाट येथील कार्यक्रमाला भाजपाने परवानगीच मागितली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर या पक्षाचा आणखी एक खोटारडेपणा उघडकीस आला. गुरुवारी दिवसभर काय होणार हे काल संध्याकाळीच स्पष्ट झाले होते. सकाळच्या धरणे आंदोलनापासून तर संध्याकाळच्या रोडशोची कार्यक्रम पत्रिका रात्रीच आखण्यात आली होती. निवडणूक आयोगाविरुद्ध जाणीवपूर्वक निषेधाचा सूर लावायचा आणि आपल्या मतांत वाढ होते की काय याची चाचपणी करायची, हे यामागील भाजपाचे गणित होते, सकाळच्या धरणे आंदोलनात ते सपशेल फसले परंतु संध्याकाळच्या मोदींच्या रोडशोला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपा वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरला. पण या दिवसभराच्या ड्रामेबाजीमुळे वाराणशीत भाजपाची अब्रू गेली. अर्थात सकाळी फज्जा आणि सायंकाळी फत्ते अशा संमिश्र उपलब्धीचे पडसाद मतदान यंत्रात कसे उमटतात, याची उत्सुकता आहेच की! च्दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने धरणे दिल्यानंतर त्याला अराजकता म्हणून टीका करणार्‍या भाजपा नेत्यांनी आज येथे अराजकतेचे टोक गाठले. च् राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते खोटे बोलतात,कुठल्याही प्रकरणाचा बाऊ करतात, ही गोष्ट आता नवी नाही. पण जेटली, शाह यांनी खोटारडेपणाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाची निष्कारण बदनामी केली. च्वाराणशीत मुस्लीम मते एकवटत असल्याने हिंदू मतेही एकत्रित यावीत आणि जाती- पोट जातीच्या नावावर विखुरणारी हिंदु मते एकवटावीत हा भाजप नेत्यांचा या मागील प्रयत्न होता. च्गंगेच्या आरतीला उपस्थित राहण्याची परवानगी मिळूनही मोदी तिथे का गेले नाहीत? उलट रोहनिया येथील सभेत ‘मला गंगा मातेची भेट घेण्यापासून रोखण्यात आले, हे पाप आहे’असा बाऊ मोदींनी केला. गंगेचे राजकारण करण्यामागील मोदींचा हेतू लपून राहिला नाही.