शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप त्रिपुरात सत्तेत येईल- शहा

By admin | Updated: May 7, 2017 01:05 IST

आपला पक्ष त्रिपुरातील प्रदीर्घ मार्क्सवादी कुशासनाचा एकमेव पर्याय असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी

लोकमत न्यूज नेटवर्कआगरतळा : आपला पक्ष त्रिपुरातील प्रदीर्घ मार्क्सवादी कुशासनाचा एकमेव पर्याय असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे म्हटले. आपला पक्ष त्रिपुरात स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून त्रिपुरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, महिलांना अजिबात सुरक्षित वाटत नाही. त्यांनी इतर बिगर डाव्या पक्षांशी युतीची शक्यता फेटाळली नाही; मात्र पक्षाचा भर स्वत:चा जनाधार बळकट करण्यावर असल्याचे स्पष्ट केले. शहा परिवर्तन यात्रेसाठी दोन दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर आले आहेत. राज्याची लोकसंख्या ३७ लाख आहे. येथील ६५ टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगत असून, २५ टक्के लोकांना पेयजलही उपलब्ध नाही, असा दावा त्यांनी केला.मार्क्सवादी हिंसाचार आणि सुडाची भावना राज्यात भाजपचा उदय रोखू शकत नाही. सत्ताधारी पक्षाने दहशत निर्माण करणे सुरू ठेवले तर भाजपला आणखी बळकटी मिळेल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)भाजप चिटफंड घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार का, असा प्रश्न विचारला असता शहा म्हणाले की, कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, असे म्हणावे लागण्याचे कारण नाही. यात गरीब लोकांची लूट झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माणिक सरकार स्वत: नैतिक आधारे सीबीआय चौकशी करण्यास सांगू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. भाजपच त्रिपुरात पुढील सरकार बनवेल. ही लढाई कठीण असणार नाही. कारण, कम्युनिस्ट संपूर्ण जगात क्षीण झाले आहेत, तर काँग्रेस आता छोटा पक्ष बनला आहे, असेही ते म्हणाले.