शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम पक्ष; द्रमुकची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:34 IST

तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट असून अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम वा मांडलिक बनलेला पक्ष आहे, अशी बोचरी टीका द्रमुकने लोकसभेत केली आहे.

नवी दिल्ली  - तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट असून अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम वा मांडलिक बनलेला पक्ष आहे, अशी बोचरी टीका द्रमुकने लोकसभेत केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणासंदर्भात अभिनंदनाच्या ठरावावरील चर्चेत द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांनी हे शरसंधान केले.ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूतील जनतेने आपल्याला का नाकारले याचे भाजपने आत्मपरीक्षण केले पाहिजे. देशातील विरोधी पक्ष दुर्बळ असल्यानेच भाजपचे फावले आहे.तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकचा फक्त एकच खासदार निवडून आला होता. मारन यांनी केलेल्या घणाघाती टीकेला लोकसभेत भाजप सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. तामिळनाडूतील राज्य सरकारविरोधात दयानिधी मारन यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भाजपने केला.भाजप-अण्णाद्रमुक यांची युती असून त्या अनुषंगाने मारन म्हणाले की, गुलामांची (अण्णाद्रमुक) काळजी घेणे हे मालकाचे (भाजप) कर्तव्य असते. या उद्गारांना संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आक्षेप घेतला. तपास यंत्रणा तसेच निवडणूक आयोगाचा भाजपकडून गैरवापर सुरूआहे, असा आरोप द्रमुकने केला आहे. अण्णाद्रमुक भाजपच्या वळचणीला गेला होता, तर द्रमुकने काँग्रेसशी युती करून लोकसभा निवडणुका लढविल्या.बेपर्वा राज्य सरकारद्रमुकने आरोप केला की, तामिळनाडूमध्ये विशेषत: चेन्नई शहरामध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या संकटकाळात अण्णाद्रमुक सरकार अत्यंत बेपर्वाईने वागत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारने फारसे हातपाय हलविलेले नाहीत.भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले होते. त्याची आठवण देऊन दयानिधी मारन म्हणाले की, तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट आहे.

टॅग्स :All India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमTamilnaduतामिळनाडू