शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

विरोधकांना शिंगावर घेण्यास भाजपा सज्ज

By admin | Updated: April 5, 2015 02:23 IST

भूसंपादन विधेयकावर सरकारची एकजुटीने कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या प्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी विरोधकांना शिंगावर घेण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे.

मुद्दा भूसंपादनाचा : राष्ट्रीय कार्यकारिणीत आडवाणींची ‘नाही मी बोलत’ची भूमिकाबंगळुरू: भूसंपादन विधेयकावर सरकारची एकजुटीने कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या प्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी विरोधकांना शिंगावर घेण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. त्यासाठी देशभरातील गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना या विधेयकाच्या सर्व पैलूंची माहिती देण्याच्या मोहिमेची घोषणा भाजपाने शनिवारी येथे केली. भूसंपादन विधेयकावरून राज्यसभेत कोंडी झालेल्या भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप करताना याच विषयावर आक्रमक धोरण स्वीकारले. परंतु ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या विनंतीनंतरही ‘नाही मी बोलत’ची भूमिका कायम ठेवल्याने भाजपाची कुचंबणा झाली. अर्थात त्यातून ज्येष्ठांना अडगळीत टाकण्याची भाजपातील नवनेतृत्वाची नीतीही स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपाच्या दिवशी, शनिवारी वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर सविस्तर चर्चा झाली. पक्षाने मंजूर केलेल्या राजकीय ठरावांमध्येही त्याचा समावेश करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला अनुमोदन दिले. भूसंपादन विधेयकाच्या समर्थनात बैठकीत एक पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करण्यात आले आणि ‘अपप्रचाराचा सामना करण्यासाठी सूचना : लोकांसमक्ष वस्तुस्थितीचे सादरीकरण’ या विषयावरील पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. विधेयकावर गंभीर आक्षेप घेणारे सरकारचे मित्रपक्ष शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल यांच्याशीही संपर्क केला जाणार असून सर्वांना सोबत घेऊन चलण्याचा भाजपाचा इरादा आहे. कोणाला नाराज करण्याची इच्छा नाही, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने (संपुआ) आपल्या मर्जीतील लोकांना कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप केले होते. त्यावेळी याच्या सामाजिक परिणामांचा विचार करण्यात आला होता का, असा सवाल त्यांनी काँग्रेसवर लक्ष्य साधून केला. विधेयकात काहीही शेतकरी विरोधात असल्यास आम्ही या मुद्यांवर सर्वांसोबत चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु यात एकही तरतूद शेतकरीविरोधी नाही असे आमचे मत आहे, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)‘विरोधकांच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्यात येईल. गावागावांमध्ये जाऊन लोकांना हा कायदा शेतकरी आणि लोकांच्या हिताचा असल्याबाबत खात्री दिली जाईल. पक्षाचा प्रत्येक सदस्य या कामात सहभागी होणार असून शेतकऱ्यांना सहकार्य करणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे.’निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्यापक्षातील बदलत्या समीकरणांची ही एक झलक आहे. सर्वसामान्यपणे अशाप्रकारच्या बैठकींमध्ये समारोपाला आडवाणी यांचे मार्गदर्शन होत असते. पक्षाच्या वतीने यासंदर्भात कुठलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. परंतु आडवाणी यांना गेल्या काही काळापासून पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्यात आले आहे. त्यांनी भाषण दिल्यास ते आपली नाराजी व्यक्त करतील अथवा पक्षाच्या ध्येयधोरणावरही टीका करतील. यामुळे पक्षाला नाचक्की सहन करावी लागेल,अशी शंका दोन दिवसांपासून व्यक्त केली जात होती. तशातच त्यांना भाषणाची प्रत दाखविण्यास सांगितल्यानेही ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे.आडवाणींचा भाषणास नकारभाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे भाषण अखेर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेच नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी विनंती केल्यानंतरही त्यांनी मार्गदर्शन करण्यास नकार दिल्याचे समजते.