शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदाराचा तीन कोटींचा ठुमका

By admin | Updated: April 19, 2015 02:17 IST

हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस आणि त्यासोबत चक्क महिला खासदाराचा डान्स. हा प्रकार आहे, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातला. या वेळी केवळ ३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले गेले.

गुजरातच्या वेरावळमधील प्रकार : बेधुंद नाचत ३० सेकंदांत पाडला पैशांचा पाऊस अहमदाबाद : हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस आणि त्यासोबत चक्क महिला खासदाराचा डान्स. हा प्रकार आहे, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातला. या वेळी केवळ ३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले गेले. टीव्हीवर संपूर्ण देशातील जनतेने नोटांचा पाऊस आणि त्यानंतर साचलेला नोटांचा ढीग पाहिला. गुजरातमध्ये वेरावळ इथल्या एका भागवतकथा कार्यक्रमात हा प्रकार सुरू होता. पैशांचा असा पाऊस यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवतेय का, नाही ना? पण ते येथे सत्यात उतरले होते. गुजरातमध्ये पैसे उधळले जाताहेत व या नोटांच्या पावसात बेभान होऊन नाचत आहेत, चक्क भाजपाच्या खासदारबाई. शेकडो लोकांसमोर थिरकणाऱ्या या पूनमबेन गुजरातमधल्या जामनगरच्या खासदार आहेत. अहीर समाजाच्या कार्यक्रमाला जणू रंगरसिया ज्वर चढला. चाळिशीतल्या खा. पूनमबेन बेधुंद नाचत होत्या. त्यांच्या तालावर एका बुजुर्ग स्थानिक नेत्यानेही ठुमका धरला व शेकडो लोकांनी नोटा उधळल्या. लोकही एवढे बेधुंद होऊन नाचत होते की काही तर एकमेकांच्या खांद्यावर बसून नोटांचा वर्षाव करीत होते.देणगीदाखल पैसे उधळलेसौराष्ट्रची ही शंभर वर्षांची परंपरा (लोक दायरो) आहे. देणगीत मिळालेल्या पैशांचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जातो. या कार्यक्रमात मी यापूर्वीही सहभागी होत आले आहे. या पैशाचा उपयोग मुलींसाठी वसतिगृह आणि गोशाळा बांधण्यासाठी केला जाईल. भाजपची खासदार म्हणून नव्हे, तर समाजकन्या म्हणून मी यात सहभागी झाले. भाविकांवर देणगीदाखल नोटांची ही उधळण करण्यात आली, अशी सारवासारव खा. पूनमबेन यांनी केली. पूनमबेन यांच्या नृत्याविष्कारादरम्यान किमान ३ कोटी उधळले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंतप्रधानांनी साध्या राहणीचा खासदारांना कितीही सल्ला दिला तरी गुजरातमध्ये पालथ्या घड्यावर अशी स्थिती आहे.