शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीतील आरोपी भाजपा आमदारास झेड श्रेणीची सुरक्षा

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

लखनौ- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर दंगलप्रकरणातील आरोपी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) आमदार सुरेश राणा यांच्या सुरक्षेत वाढ करताना केंद्र सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली असून आता देशातील सर्वाधिक सुरक्षित राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर दंगलप्रकरणातील आरोपी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) आमदार सुरेश राणा यांच्या सुरक्षेत वाढ करताना केंद्र सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली असून आता देशातील सर्वाधिक सुरक्षित राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.
मुजफ्फरनगरमध्ये २०१३ साली उफाळलेल्या दंगलीपूर्वी काही दिवस प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपावरून राणा यांना अटक करण्यात आली होती. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. या दंगलीत ६० लोक ठार झाले होेते. आता एक पायलट कार आणि सशस्त्र सुरक्षा दलाशिवाय ३२ कमांडो या आमदाराच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात राहतील. त्यांच्या जीवाला असलेला धोका आणखी वाढला असल्याचे स्थानिक आढाव्यातून निदर्शनास आल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. तर आपल्याविरुद्धच्या खोट्या प्रकरणांमुळे आपला जीव धोक्यात आल्याचा या आमदारमहोदयांचा दावा आहे.
दंगलींनंतर उत्तर प्रदेश सरकारने आमच्याविरुद्ध अनेक खोटी प्रकरणे दाखल केली. त्यामुळे आपले शत्रू वाढले, असे राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या दंगलीतील आणखी एक आरोपी भाजपाचे आमदार संगीत सोम यांना गेल्या ऑगस्ट महिन्यात झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्याच्या निर्णयानंतर गृहमंत्रालयाला तीव्र टीकेचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी राणा यांनी सुद्धा झेड श्रेणीची सुरक्षा मागितली होती.
दरम्यान राज्यातील भाजपा नेत्यांनी मात्र राणा यांच्याविरुद्धचे गुन्हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असून त्यांच्या जीवाला खरच धोका असल्याचे सांगत सुरक्षा वाढीचा वाद वाढविण्याचे टाळले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय प्रचारादरम्यान आग्रा येथे एका सभेत या दोन वादग्रस्त आमदारांचा सत्कार करण्यात आला होता. या सभेला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले होते.