भाजप आमदारावर गुन्हे
By admin | Updated: November 7, 2015 23:27 IST
भाजपच्या २९ जणांवर गुन्हे
भाजप आमदारावर गुन्हे
भाजपच्या २९ जणांवर गुन्हेपालकमंत्री एकनाथराव खडसे यांची सादरे प्रकरणात बदनामी केल्याच्या निषेधार्थ २६ ऑक्टोबर रोजी कोणतीही परवानगी न घेता घोषणाबाजी तसेच वृत्तपत्राची होळी करून जिल्हाधिकारी यांच्या दालनातही घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात आमदार सुरेश भोळे, आमदार गुरुमुख जगवाणी, डॉ.सुरेश सूर्यवंशी, वामनराव खडके, दीपक सूर्यवंशी, उदय वाघ, नितीन पाटील, सीमा भोळे, वासंती चौधरी, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, विजय गेही, कैलास सोमानी, ॲड.सत्यजीत पाटील,अतुलसिंह हाडा,चेतन शर्मा, शिवदास साळुंखे, हेमंत देवरे, राहुल तिवारी, डॉ.के.डी.पाटील, राजेंद्र घुगे, भगत बालाणी, भारती सोनवणे, अनिल देशमुख, दिलीप नाजरकर,महेश जोशी, नीलेश झोपे, रवी पाटील, अरुण बोरोले यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोट..चौकशी अंती राजकीय पक्षाच्या तसेच सामजिक संघटनेच्या कार्यर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यात हर विना परवानगी तसेच नियम मोडून आंदोलन करणार्यांवर अशाच प्रकारे गुन्हे दाखल केले जातील.-नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक