नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आल्यानंतर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी अखेर आपले वादग्रस्त टिष्ट्वट मागे घेतले. तथापि भाजपाचे दुसरे नेते खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र शाहरुखवर टीकेची झोड उठवत त्याची पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद याच्याशी तुलना केली. दरम्यान, विजयवर्गीय यांचे मत हे पक्षाचे अधिकृत मत नाही, असे सांगत भाजपने हात झटकले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाहरुखची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली. दुसरीकडे हाफिज सईदने शाहरुख खानला पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले आहे.विजयवर्गीय यांनी आपले शाहरुखविरोधी टिष्ट्वट मागे घेतले असले तरी टोमणा मारण्याची संधी मात्र सोडली नाही. ‘भारतात असहिष्णुता असती तर अमिताभ बच्चनच्या खालोखाल शाहरुख खान सर्वांत लोकप्रिय अभिनेता झालाच नसता. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी कालचे टिष्ट्वट मागे घेतो,’ असे विजयवर्गीय यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.देशातील असहिष्णुता वाढली असल्याचे शाहरुखने म्हटले होते आणि त्यावरून विजयवर्गीय यांनी शाहरुखला देशद्रोही संबोधून तो भारतात राहात असला तरी त्याचे हृदय पाकिस्तानात आहे, असे म्हटले होते. दरम्यान, विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त टिष्ट्वटपासून भाजपाने हात झटकले आहेत. ‘ते भाजपाचे मत नव्हे. शाहरुखशी आमची नाराजी नाही. तो महान अभिनेता आहे,’ असे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांना भाजपा श्रेष्ठींनी तंबी दिली असली तरी भाजपाचे वादग्रस्त खासदार योगी आदित्यनाथ यांनी आपली बेताल वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. त्यांनी बुधवारी शाहरुख खानची तुलना पाकिस्तानी दहशतवादी आणि मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार हाफिज सईद याच्याशी करून नव्या वादाला तोंड फोडले. आदित्यनाथ म्हणाले, ‘भारतात असहिष्णुता वाढली असे वाटणाऱ्या शाहरुखने पाकिस्तानात जावे. या देशातील लोकांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला तर त्यालाही सामान्य मुस्लिमाप्रमाणे रस्त्यावर भटकावे लागेल. हे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत. शाहरुख आणि हाफिज सईद यांच्या भाषेत कसलाही फरक नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर काही कलावंत व लेखकांनी देशद्रोह्यांसारखे बोलायला सुरुवात केली आहे आणि शाहरुखनेही त्यांच्या सुरात सूर मिसळत आपला पाठिंबा दिला आहे.’भाजपाच्या नेत्या साध्वी प्राची यांनीही शाहरुखला पाकिस्तानचा हस्तक म्हटले आहे, हे येथे उल्लेखनीय. (लोकमत न्यूज नेटवर्क)हाफिज सईद : तर शाहरुख खानने पाकिस्तानात यावेशाहरुख खान याच्याप्रमाणे भारतात मुस्लिम नागरिकांना केवळ आपल्या धर्मामुळे अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी भारत सोडून पाकिस्तानमध्ये यावे, असे विधान करून पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याने आगीत तेल ओतले आहे.भाजपा नेत्यांनी शाहरुखवर केलेल्या टीकेची दखल घेत हाफिजने टिष्ट्वटरवरून हे निमंत्रण दिले. ‘कला, क्र ीडा व संस्कृती क्षेत्रात जगभरात आपले नाव कमावणाऱ्या भारतीय मुस्लिमांना आपली ओळख टिकविण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे. या भारतीय मुस्लिमांमध्ये शाहरुख खानही आहे. त्याला आपल्या धर्मामुळे भेदभाव सहन करावा लागत असेल, तर त्याने पाकमध्ये यावे.’शिवसेना शाहरुखच्या पाठीशीभाजपा नेते हल्ला करीत असले तरी शिवसेनेने मात्र शाहरुखला पाठिंबा दिला आहे. शाहरुख केवळ मुस्लिम आहे म्हणून त्याला लक्ष्य करण्यात येऊ नये. भारतातील अल्पसंख्याक समाज सहिष्णू आहे. हा देश सहिष्णू आहे आणि मुस्लिमही सहिष्णूच आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.शाहरुखचा पुतळा जाळलाइंदूर : असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी इंदूर येथे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी शाहरुख खान याच्या पुतळ्याचे दहन केले. भाजपा नेते विजयवर्गीय यांनी शाहरुखबद्दल ‘बीभत्स’ टिष्ट्वट केले आहे. -डेरेक ओब्रायन, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्तेशाहरुख तुझ्या वक्तव्यामुळे अखंड भारत बनायला मदत मिळेल.- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्रीभाजप नेत्याचे शाहरुखविरोधी वक्तव्य खरे असेल तर ते निषेधार्ह आहे. वक्तव्याला पक्षाचा पाठिंबा नाही. -वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्रीभाजपाच्या काही नेत्यांनी खरोखरच जिभेला लगाम लावण्याची आणि शाहरुखविरुद्ध निरर्थक बडबड करणे थांबविण्याची गरज आहे. -अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेतेभाजपा नेत्यांनी शाहरुख खानविरुद्ध केलेल्या वादग्रस्त व प्रक्षोभक वक्तव्याची जबाबदारी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. -दिग्विजयसिंग, काँग्रेस नेतेदेशातील वातावरण पार बिघडले आहे. आता शाहरुखने भारतात राहावे की पाकिस्तानात जावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगितले पाहिजे.-मनीष तिवारी, काँग्रेस नेते
भाजपा नेत्यांची शाहरूखवर आगपाखड
By admin | Updated: November 5, 2015 02:57 IST