जलपायगुडी/कोलकाता : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बालकांच्या तस्करीप्रकरणी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी जुही चौधरी यांना मंगळवारी रात्री अटक केली. तथापि, भाजपने बुधवारी आपला कोणीही नेता यात गुंतल्याचा इन्कार करून हा कारस्थानाचा प्रकार असल्याचे सांगितले. जयपायगुडीच्या बिमला शिशुगृहातील १७ बालकांची देश-परदेशात विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी सीआयडीने चौधरी यांना भारत-नेपाळ सीमेजवळील बतासिया भागात अटक केली. चौधरींच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसची आघाडी असल्याप्रमाणे सीआयडी काम करीत असल्याचा आरोप केला. आमच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तृणमूलने हे कारस्थान रचल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.
बालकांच्या तस्करीप्रकरणी भाजपा नेत्या चौधरी अटकेत
By admin | Updated: March 2, 2017 04:17 IST