शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या स्थितीचे खापर भाजपाने फोडले मेहबुबांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 04:05 IST

भाजपने जम्मू-काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारशी तीन वर्षांपूर्वीची आघाडी तोडताना राज्यातील बिघडत्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्यावर फोडले आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपने जम्मू-काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारशी तीन वर्षांपूर्वीची आघाडी तोडताना राज्यातील बिघडत्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्यावर फोडले आहे. भाजपाचे महासचिव आणि राम माधव म्हणाले की, भाजपासाठी जम्मू- काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे. मात्र, सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे राज्यपाल शासन आणले जावे, असा आम्ही निर्णय घेतला आहे.सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबाबत सर्व एजन्सींचे मत घेण्यात आले. गृह मंत्रालयाशी चर्चा करण्यात आल्यानंतर भाजपाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी लोकांचा कल पाहून परिस्थितीच्या आधारे ही आघाडी झाली होती. मात्र, अशी परिस्थिती आहे की, आघाडी पुढे चालविणे शक्य नव्हते.मात्र, परिस्थितीत सुधारणा झाली नाही. राज्यात दहशतवाद वाढला आणि फुटीरवाद्यांनाही बळ मिळाले. विकासकार्यात केंद्राने मदत करुनही जम्मू व लडाखची उपेक्षा करण्यात आली. भाजपाशी भेदभाव करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. पत्रकार शुजात बुखारीयांच्या हत्येचा उल्लेख करुन ते म्हणाले की, राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे.राज्य सरकारमध्ये तर तुम्हीही होता? असा सवाल केला असता ते म्हणाले की, भाजपा राज्य सरकारचा एक भाग होता. मात्र, नेतृत्व पीडीपीच्या हाती होते. महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जात होते.>राज्याच्या विकासासाठी केंद्राचे सर्वोतोपरी प्रयत्नउधमपूरचे संसद सदस्य आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता, राज्य सरकारचे मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांच्या उपस्थितीत राम माधव यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. शांततेसाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. फुटीरवाद्यांशी चर्चेसाठी दिनेश्व शर्मा यांना नियुक्त केले. परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून गृहमंत्री सातत्याने दौरा करत होते. रमजानच्या पवित्र महिन्यात शस्त्रसंधीही करण्यात आली.>कधी झाला निर्णय?भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांत झालेल्या समन्वय बैठकीत राज्याची स्थिती व आघाडीबाबत समीक्षा करण्यात आली. त्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अमित शहा व संघाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्याच रात्री झाला. परंतू, या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे ठरायचे होते. काश्मिरातील पक्षाचे नेते व मंत्री यांना विश्वासात घेणे बाकी होते. त्यामुळे तेथील भाजपाच्या मंत्र्यांशी दिल्लीत अमित शहा यांनी चर्चा केली. त्यानंतर आज घोषणा करण्यात आली.पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा व संघ पदाधिकाºयांसोबत घेतलेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर