शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार देणार आणीबाणीच्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: June 22, 2017 19:21 IST

आणीबाणी हे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील एक काळे पान मानले जाते. आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे कणखर आणि धाडसी

 ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - आणीबाणी हे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील एक काळे पान मानले जाते. आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे कणखर आणि धाडसी निर्णयांसाठी लोकप्रिय असलेल्या इंदिरा गांधी यांच्यावर अजूनही टीका होत असते. आता आणीबाणीच्या काळातील कटू आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यासाठी 25 जूनला आणीबाणीच्या 42 व्या वर्षपूर्ती दिवशी मोदी सरकार आपल्या मंत्र्यांना देशाच्या विविध भागात पाठवणार आहे.  आणीबाणीच्या कटू स्मृतींबाबत लोकांना माहिती देणे हा याचा हेतू असेल.1975 साली तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात होत असलेल्या आंदोलनांना नियंत्रणात आणण्यासाठी अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली होती. त्यानंतर आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या विरोधी पक्षामधील अनेक नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले होते.

( देशात अघोषित आणीबाणी )

( हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी )

आता आणीबाणीच्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात  कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या कार्यक्रमात भाजपाचे नेते आणीबाणीच्या वेळच्या परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत, ज्यामुळे आणीबाणी लागू करण्यात आली. याबाबत भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, "आणीबाणीच्या काळात बिगर काँग्रेसी सरकारांचा सत्तापालट एका दिवसांत झाला होता. ही बाब आजच्या तरुणांच्या विस्मृतीत जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे."  आता भाजपाच्या या खेळीमुळे देशातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.