शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेवर भाजपा सतत हल्ले करतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:30 IST

राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू असून, स्वायत्त व घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे.

रायपूर/नवी दिल्ली : राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू असून, स्वायत्त व घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. हे प्रकार केवळ पाकिस्तान व हुकूमशाहीतच घडू शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. छत्तीसगढच्या जाहीर सभेत त्यांनी कर्नाटकात आमदारांच्या पळवापळवीचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यावरही हल्ला चढवला.कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार व दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण असल्याचे ते म्हणाले. भाजपाकडून पोकळ विजयाचा आनंद साजरा केला जात असून प्रत्यक्षात देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे, असे टिष्ट्वटही त्यांनी केले. कर्नाटकातील घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसने उद्या देशभर लोकशाही बचाव दिन पाळण्याचे ठरवले आहे. दिल्ली तसेच देशातील सर्व शहरांमध्ये काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते धरणे, मोर्चे व आंदोलन करून, हा दिवस पाळणार आहेत.>काँग्रेसने संधीसाधूपणा करून जनता दलास पाठिंबा दिला, तेव्हाच खरे तर लोकशाहीची हत्या झाली. काँग्रेसने कर्नाटकच्या कल्याणासाठी नव्हे, तर राजकीय फायद्यासाठी जनता दलास पाठिंबा दिला. काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा इतिहास माहीत नसावा. आणीबाणी, कलम ३५६ चा दुरुपयोग, न्यायालये तसेच प्रसारमाध्यमांना दुबळे करणे हा काँग्रेसचा इतिहास आहे.- अमित शहा

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी