शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

दिल्ली महापालिकांमध्ये पुन्हा भाजपा?

By admin | Updated: April 24, 2017 00:48 IST

दिल्लीत तीनही महापालिकेत भाजपला तिसऱ्यांदा बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलने हा अंदाज वर्तविला आहे.

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीदिल्लीत तीनही महापालिकेत भाजपला तिसऱ्यांदा बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलने हा अंदाज वर्तविला आहे. महापालिकेत प्रथमच नशिब आजमावत असलेल्या आम आदमी पार्टीला आणि काँग्रेसला फारशा जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. एबीपी सीव्होटरच्या अंंदाजानुसार, तीन महापालिकेतील २७० पैकी २१८ जागांवर भाजपला विजय मिळेल. आम आदमी पार्टीला २४ आणि काँग्रेसला २२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बीएसपीला केवळ ८ जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजपला ८० जागांचा फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसला ५५ आणि बीएसपीला ४९ जागांचे नुकसान होत आहे. आज तक - एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार, भाजपला २०२ ते २२० जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला १९ ते ३१ जागा आणि आम आदमी पार्टीला २३ ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ८ ते १६ जागांवर अपक्ष आणि अन्य पक्षांचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएमच्या मशिनच्या गडबडीबाबत तक्रार केली आहे. मतदान अधिकाऱ्यांनी अनेक मतदारांना मतदान करु दिले नाही, असेही यात म्हटले आहे.दिल्ली महापालिका निवडणुकीत ५४ टक्क्यांहून अधिक मतदान दिल्ली महापालिकेसाठी रविवारी ५४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, सकाळी आठ वाजता सुरू झालेले मतदान साडेपाच वाजता संपले. श्रीवास्तव यांनी सांगितले की, दिल्लीच्या सर्वच भागांत मतदान शांततेत पार पडले. दुपारी चार वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाची गती वाढली. गत मतदानाच्या तुलनेत यंदा अधिक मतदान झालेले असेल. हे मतदान ५४ टक्क्यांपेक्षा अधिक असू शकते. २०१२ च्या निवडणुकीत ५४ टक्के मतदान झाले होते. चार वाजेपर्यंतच ५९ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात सर्वाधिक २२ लाख मतदारांनी उत्तर दिल्ली महापालिकेसाठी मतदान केले. तीन महापालिकेत एकूण २७२ वॉर्ड असून २७० वॉर्डसाठी रविवारी मतदान झाले.उमेदवारांच्या मृत्यूमुळे दोन ठिकाणचे मतदान स्थगित करण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपचे २६६, आपचे २६२ आणि काँग्रेसचे २६७ तर स्वराज इंडियाचे १०९ उमेदवार रिंगणात आहेत.