शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
2
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
5
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
6
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
7
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
8
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
9
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
10
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
11
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
12
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
13
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
14
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
15
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
16
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
17
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
18
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
19
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
20
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, मित्रपक्षांची १८ राज्यांत सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली महाआघाडी मोडूनही नितिश कुमार यांनी बिहारची सत्ता कायम राखणे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. कारण बिहारच्या रूपाने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांकडे केंद्रातील सत्तेखेरीज देशातील १८ राज्यांची सत्ता आली.सन १९९३ नंतर तब्बल २४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली महाआघाडी मोडूनही नितिश कुमार यांनी बिहारची सत्ता कायम राखणे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. कारण बिहारच्या रूपाने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांकडे केंद्रातील सत्तेखेरीज देशातील १८ राज्यांची सत्ता आली.सन १९९३ नंतर तब्बल २४ वर्षांनी राजकीय इतिहासाची उलट्या पद्धतीने पुनरावृत्ती झाली. १९९३ मध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे अशाच प्रकारे देशातील १८ राज्यांची सत्ता आली होती. अर्थात यात सत्ता असलेल्या राज्यांचा १८ हा आकडा सारखा असला तरी गेल्या दोन दशकात देशात प्रामुख्याने आघाडी आणि युतीची सरकारे आल्याने याची राजकीय समिकरणे मात्र बदलली आहेत. आज केंद्रातील ‘राओला’आघाडीसह विविध राज्यांमधील सत्तांमध्ये मिळून भजपासोबत एकूण ४३ लहान-मोठे पक्ष आहेत. भाजपाची स्वत:ची अथवा मित्रपक्षांच्या आघाडीची उत्तराखंड, हरियाणा, यूपी, राजस्थान, मध्य ्परदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, आसाम, जम्मू-काश्मीर, सिक्किम, बिहार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा व नागालँड या राज्यांमध्ये सरकारे आहेत.लोकसभेतील ६६ टक्के खासदार निवडून देणारी राज्ये१काँग्रेसकडे सत्ता असलेली १९९३ मधील १८ राज्ये आणि भाजपा व मित्रपक्षांकडे सत्ता असलेली आताची १८ राज्ये यात दोन बाबतीत मोठा फरक आहे. आता भाजपा आणि मित्रपक्षांकडे असलेली राज्ये मोठी व हिंदी पट्ट्यातील आहेत. लोकसभेतील ६६ टक्के सदस्य निवडून देणारी ही राज्ये आहेत. काँग्रेसकडे जी १८ राज्ये होती ती तुलनेने लहान होती व लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर तेथून फक्त ४८ सदस्य निवडून जायचे.२आणखी एक फरक असा की, काँग्रेसकडे १९९३ मध्ये असलेल्या १८ राज्यांमध्ये भारताच्या सन १९९१च्या जनगणनेनुसार ४५ टक्के लोकसंख्या राहात होती. आता सन २०११ च्या शिरगणतीनुसार ६८ टक्के लोक भाजपा व मित्रपक्षांची सत्ता असलेल्या १८ राज्यांमध्ये आहे.