शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातील शाळांत शिकविणार भगवान परशुराम यांचे जीवनचरित्र

By admin | Updated: April 30, 2017 00:47 IST

भगवान परशुराम यांच्यावरील धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासह त्यांच्यावरील पुस्तके शालेय वाचनालयांना पुरविण्यात येतील

जयपूर : भगवान परशुराम यांच्यावरील धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासह त्यांच्यावरील पुस्तके शालेय वाचनालयांना पुरविण्यात येतील, असे आश्वासन राजस्थानचे शालेय शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी राजस्थानी ब्राह्मणांच्या ‘विप्र फाऊंडेशन’ला दिले. भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने परशुराम जयंतीनिमित्त तोपदडा येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील आश्वासन दिले. भगवान परशुराम यांच्यावरील पुस्तके शालेय वाचनालयांना पुरविण्यासाठी लागणारे पैसे आपल्या स्वेच्छानिधीतून देण्याचेही त्यांनी जाहीर केले. युवा पिढीला भगवान परशुराम यांच्या जीवनचरित्रातून बोध घेण्याची आवश्यकता आहे. धर्माच्या रक्षणासाठी परशुराम यांनी दिलेले योगदान भारतीय संस्कृतीत अद्वितीय आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून आठव्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्यावरील धड्याचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले. रोष कमी करण्याचा प्रयत्न- ‘बरेच ब्राह्मण पांडित्य नसूनही नावामागे ‘पंडित’ अशी उपाधी लावून मिरवितात’, असे विधान करून देवनानी यांनी ब्राह्मण समाजाचा रोष ओढवून घेतला होता. - आता हे आश्वासन देऊन त्यांनी ब्राह्मणांना गोंजारण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे मानले जाते. काँग्रेसची टीका : काँग्रेसने देवनानी यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्र्यांनी स्वत:च्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी सरकारी पैशाचा विनियोग करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले.