बिलोली तहसीलदारांनी गिीचा टिप्पर पकडला
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
बनावट पावती असल्याचे उघड, दंडात्मक कार्यवाही
बिलोली तहसीलदारांनी गिीचा टिप्पर पकडला
बनावट पावती असल्याचे उघड, दंडात्मक कार्यवाहीबिलोली : विना रॉयल्टी मार्गाने नायगाव तालुक्यातून कुंडलवाडीकडे जाणारा गिीचा टिप्पर बिलोलीच्या तहसीलदारांनी पाठलाग करून पकडला़ दरम्यान, चौकशीअंती साई स्टोन क्रेशर होटाळा येथील गिी असल्याचे पुढे आले़ पण सदरील स्टोन क्रेशरला नायगाव तहसीलदारांनी यापूर्वीच सील केल्याचे चौकशीत आढळले़सध्या मांजरा, गोदावरी आणि मन्याड नदीपात्रातील वाळू उपशावर पूर्णत: बंदी आहे़ सप्टेंबरनंतर कोणत्याही शासकीय अथवा खाजगी वाळू घाटांना वाळूसाठी परवानगी दिलेली नाही़ पण वाळूप्रमाणेच काही खाजगी शेतमालक दगड काढून गिी तयार करीत असल्याचे पुढे आले़ शनिवारी संपूर्ण जिल्ातील स्टोन क्रेशर मालकांची निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ सर्व तहसीलदारांना अनधिकृत दगड उत्खनन करून गिी तयार करणार्या मालकांवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले़ यापूर्वीच जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार थकित स्टोन क्रेशर कारखान्यावर सील करून अहवाल पाठविण्यात आला़ बिलोलीतील चारही स्टोन क्रेशर सध्या बंद करण्यात आले़ अशा स्थितीत दगडी गिीची वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे़ पण नायगाव येथून कुंडलवाडीकडे गिी जाणारे टिप्पर बिलोलीच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी पकडले़ चौकशीदरम्यान गिीची पावतीच बनावट निघाली़ तर नायगाव तहसीलदारांशी संपर्क करून संबंधित स्टोन क्रेशरची माहिती घेतली तेव्हा हे यापूर्वीच सील केल्याचे निघाले़ सीमावर्ती भागात बिलोली व नायगाव तहसीलदारांनी वाळू पाठोपाठ गिीची धरपकड सुरू केली आहे़ टिप्पर मालकाला ३० हजारांचा दंड लावण्यात आला आहे़