शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय डॉक्टरांसाठी अमेरिकी संसदेत मांडले विधेयक

By admin | Updated: April 25, 2015 12:39 IST

उच्चशिक्षित डॉक्टर्सची कमतरता जाणवत असल्याने भारत व पाकिस्तानातील डॉक्टरांना अमेरिकेत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी अमेरिकी संसदेत खास विधेयक सादर करण्यात आले

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २५ - उच्चशिक्षित डॉक्टर्सची कमतरता जाणवत असल्याने  भारत व पाकिस्तानातील डॉक्टरांना अमेरिकेत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी अमेरिकी संसदेत खास विधेयक सादर करण्यात आले आहे. परदेशातील डॉक्‍टरांना अमेरिकत काम करण्यासाठी व्हिसा मंजुरीच्या प्रक्रियेला वेग देणारे हे विधेयक आहे. 
भारतात दहा हजार लोकांमागे ६ तर पाकिस्तानात ८ डॉक्टर आहेत, त्या तुलनेने अमेरिकेत हीच संख्या २४ आहे. मात्र असे असले तरी अमेरिकेला डॉक्टरांची आणखी गरज भासत असून , त्याच पार्श्वभूमीवर हे विधेयक सादर करण्यात आले. जीआरएडी ( ग्रॅट रेसिडन्सी फॉर अॅडिनशनल डॉक्टर्स) कायदा नावाचे हे विधेयक शुक्रवारी ग्रेस मेग (डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार ) व टॉम एम्मर ( रिपब्लिक पक्षाचे खासदार) यांनी सादर केले. या विधेयकामुळे परदेशी डॉक्टरांच्या व्हिसा मंजुरीच्या प्रक्रियेला गती देण्याचे अधिकार राज्य विभागांना मिळणर असून  त्यामुळे अन्य देशातील डॉक्टरांचा अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये काम करण्याचा मार्ग मोकळा होईल. 
परदेशातील डॉक्टरांना  तात्पुरत्या कालावधीसाठी अमेरिकी दूतावासातातून 'जे-१' व्हिसा दिला जातो, मात्र ती प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने तो व्हिसा मिळण्यास उशीर होतो.  त्यामुळे अनेक डॉक्टर अमेरिकेत येण्यास नाखूश असतात. हीच बाब लक्षात घेऊन व्हिसा मिळण्याची ही प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हमून हे विधेयक सादर करण्यात आले.