शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांविरुद्धच्या चौकशीसाठी विधेयक

By admin | Updated: February 8, 2016 03:26 IST

न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध ‘दुर्वर्तन आणि अकार्यक्षमता’ संबंधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी विद्यमान व्यवस्थेत बदल करणारे नवे विधेयक आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

नवी दिल्ली : उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध ‘दुर्वर्तन आणि अकार्यक्षमता’ संबंधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी विद्यमान व्यवस्थेत बदल करणारे नवे विधेयक आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.या आधीच्या संपुआ सरकारने ‘न्यायिक आदर्श आणि जबाबदारी विधेयक’ आणले होते; परंतु २०१४ मध्ये १५ वी लोकसभा विसर्जित झाल्यानंतर हे विधेयक निष्प्रभ ठरले होते. आता काही बदल करून हे विधेयक नव्याने सादर करण्याची नरेंद्र मोदी यांच्या सरकारची इच्छा आहे. हे विधेयक १२ मार्च २०१२ रोजी लोकसभेत पारित करण्यात आले होते; परंतु न्यायसंस्था आणि कायदेपंडितांनी त्यातील काही तरतुदींना आक्षेप घेतल्यानंतर राज्यसभेने त्यात अनेक दुरुस्त्या केल्या होत्या. त्या निष्प्रभ ठरलेल्या विधेयकात न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींवर विचार करण्यासाठी सर्वंकष यंत्रणा स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती. ‘न्यायिक जबाबदारीसाठी राष्ट्रीय न्यायिक निगराणी समिती गठित केली जाऊ शकते, ज्यात न्यायपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरन्यायाधीश, संसदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कायदामंत्री आणि नागरिक समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या नामवंत व्यक्तीचा समावेश केला जाऊ शकतो,’ असेही या नोटमध्ये म्हटले आहे.‘न्यायाधीशांच्या मनात स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि जबाबदारी रुजविण्यासाठी एखाद्या अध्यादेशावर तात्काळ विचार करण्यात आला पाहिजे. एक सुधारित न्यायिक आदर्श आणि जबाबदारी विधेयक पुन्हा सादर करून असे केले जाऊ शकते,’ असे विधि मंत्रालयाच्या एका नोटमध्ये म्हटले आहे. ‘न्यायिक आदर्श आणि जबाबदारी विधेयक निष्प्रभ झाले आहे आणि आम्ही पुन्हा त्यावर काम करीत आहोत; परंतु कोणताही निर्णय संब्ांंधित पक्षांसोबत विचारविमर्श करूनच घेण्यात येईल,’ असे कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेत सांगितले होते.’