शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायाच्या वादातून झाले विक्रमचे अपहरण ! पोलिसांची शोध मोहिम : भागिदारच्या पैशातून झाला होता वाद...

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.

लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.
लातूर शहरातील आदर्श कॉलनी- रामनगर येथील आपल्या मामाकडे राहणार्‍या विक्रम मुरलीधर पांचाळ (२०) याचा भागिदारीत एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करण्याचा पटेल नगरात व्यवसाय आहे. कच्चा माल आणून तो पक्का करुन बाजारात बल्बची विक्री केली जाते. या व्यवसायात सोनी कुटुंबातील तिघांचा आणि विक्रम पांचाळ अशी चौघांची भागिदारी आहे. भागिदारीतील मालकी हक्कावरुन विक्रम आणि सोनी कुटुंबियांत एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. यातून त्याला मारहाणही करण्यात आली होती. या मारहाणीमुळे घाबरलेल्या विक्रमने पंधरा दिवस दुकानाकडे फिरकलेच नाही. यात विक्रमचे नातेवाईक आणि मामा ओमप्रकाश आलमलेकर यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. शेवटी कच्च्या मालातून तयार झालेल्या वस्तूंच्या विक्रीतून आपले गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणीही त्याच्या नातेवाईकांनी केली होती. शेवटी याच वादातून आपल्या भाचाचे व्यवसायातील भागिदारांनीच अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेनेही पोलिसांचा शोध, तपास सुरु आहे. नरबळीसाठी झालेल्या विक्रमच्या अपहरणाने रविवारी वेगळेच वळण घेतले.
चौघांत व्यवसाय...
शहरातील पटेल नगरात एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करणे, विक्रीचे दुकान-गोदाम आहे. या व्यवसायात चौघांची भागिदारी आहे. विक्रमने दिड लाख तर सोनी कुटुंबियातील तिघांनी चार लाखांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. रॉ मटेरियलचा वापर करुन बल्ब तयार करण्याचे काम येथे केले जाते. याच व्यवसायाच्या वादातून विक्रमचे अपहरण करण्यात आल्याचा संशय विक्रमच्या मामाने व्यक्त केला आहे.
संशयामुळे खळबळ...
लातूर शहरातुन शुक्रवारी भरदिवसा विक्रम पांचाळ या युवकाचा नरबळी देण्यासाठीच अपहरण करण्यात आला असल्याच्या संशयामुळे खळबळ उडाली. आपले अपहरण करण्यात आले असून, पाउस पडावा यासाठी आपला नरबळी देण्यात येणार असल्याचा मॅसेस विक्रमने आपल्या मामाच्या मोबाईलवर टाकला. परिणामी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांची शोध मोहिम...
प्रसाद सगरने आपले अपहरण केले असल्याचा मॅसेज विक्रम पांचाळने आपल्या मामाच्या मोबाईलवर पाठविल्यानंतर, रविवारी प्रसाद सगर आणि व्यावसायीक भागिदार असलेल्या सोनी कुटुंबांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र प्रसाद सगर आणि विक्रम पांचाळची साधी ओळखही नसल्याची मोहिती लातूर ग्रामीण पोलिसांनी दिली. परिणामी विक्रमचे अपहरण नेमके कोणी केले, याचे गुढ मात्र वाढले आहे.