शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारात यूपी, बिहारचा वरचष्मा!

By admin | Updated: November 10, 2014 04:40 IST

शपथविधी समारंभावर शिवसेनेने घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला

नवी दिल्ली : शपथविधी समारंभावर शिवसेनेने घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, हंसराज अहिर, शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू, जे.पी. नड्डा आणि वीरेंद्र सिंग यांच्यासह २१ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. लोकसभेत भाजपाचे ७३ खासदार पाठविणा-या उत्तर प्रदेशचा आणि विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेल्या बिहारचा स्पष्ट प्रभाव या विस्तारावर आहे. पर्रीकर, प्रभू व नड्डा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणाला मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार दिल्याने सेनेचे अनिल देसाई यांना शपथ न घेताच मुंबईत परत यावे लागले.या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४५वरून ६६वर पोहोचली आहे. यात पंतप्रधानांसह २७ कॅबिनेट दर्जाचे, १३ राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार असलेले आणि २६ राज्यमंत्री दर्जाचे सदस्य आहेत. बंडारू दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी आणि गौतम बुद्धनगरचे खासदार महेश शर्मा यांचा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून समावेश करण्यात आला आहे. रुडी व दत्तात्रय दोघे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. १४ नव्या राज्यमंत्र्यांमध्ये मुख्तार अब्बास नकवी, रामकृपाल यादव, हरिभाई पारथीभाई चौधरी, सांवरलाल जाट, मोहनभाई कल्याणजीभाई कुंडारिया, गिरिराज सिंह, हंसराज गंगाराम अहिर, प्रा. रामशंकर कठेरिया, जयंत  सिन्हा, राज्यवर्धन सिंह राठौड, बाबुल सुप्रियो, साध्वी निरंजन ज्योती, विजय सांपला (सर्व भाजपा) आणि वाय. एस. चौधरी (तेदेपा) यांचा समावेश आहे.आपण कोणत्याही प्रकारची बंडखोरी वा नाराजी खपवून घेणार नाही आणि आपल्याला कुणी निर्देश देऊ शकत नाही हेही मोदी यांनी शिवसेनेला दूर ठेवून दाखवून दिले आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, राज्यसभेचे उपसभापती जे. पी. कुरियन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी व भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसचा कोणताही नेता शपथविधी समारंभाला उपस्थित नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अन्य भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. शपथविधी समारंभाला जाण्याआधी मोदी यांनी नव्या मंत्र्यांना आपल्या ७, रेसकोर्स या निवासस्थानी चहापान दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)