शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा बिगुल दिवाळीपूर्वी वाजणार

By admin | Updated: May 18, 2015 02:57 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी एकजूट जनता परिवार सज्ज झाला असताना येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी एकजूट जनता परिवार सज्ज झाला असताना येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात २४३ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. तथापि ही निवडणूक किती टप्प्यात होईल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे.निवडणुकीदरम्यान धन व शक्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जाणार आहे. दलांचा पुरेसा फौजफाटा उपलब्ध झाल्यानंतर सप्टेंबर ते आॅक्टोबरमध्ये कुठल्याही क्षणी बिहार निवडणूक होऊ शकते, असे जैदी म्हणाले.३१ जुलैपर्यंत मतदार याद्या तयार होतील. यानंतर मान्सूनची स्थिती, पूर, सणवार, परीक्षा, सुट्या आदींचा विचार करून निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक तयार केले जाईल. पैशाचा गैरवापर ही बिहारातील मोठी समस्या आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोग आधीपेक्षा अधिक सतर्क असेल. कायदा मंत्रालयाकडून काही कायदेशीर तरतुदी यायच्या आहेत. मात्र, आमच्याकडे असलेल्या अधिकारांतर्गत निवडणूक खर्चावर अंकुश ठेवण्याचे काम आयोग चोख बजावेल, असेही ते म्हणाले.मतांसाठी पैसे, भेटवस्तू व मद्य वाटप करण्याऱ्या आणि ‘चॅनल’ रूपात काम करणाऱ्या व्यक्तीकडे आमचे विशेष लक्ष असेल. यादृष्टीने नियोजन अद्यापही सुरूआहे. निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणारी नवी प्रणाली आम्ही लवकरच जारी करू, असेही त्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)