शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

बिहारी नाट्य सुरुच, नितीशकुमारांच्या पक्षात फूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:46 IST

गेल्या आठवड्यात महागठबंधनमधून बाहेर पडून नितीशकुमार यांनी एनडीएच्या पाठिंबा घेत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी सुरु झालेलं बिहारी नाट्या अद्याप संपलेलं दिसत नाही

पाटणा, दि. 02 - गेल्या आठवड्यात महागठबंधनमधून बाहेर पडून नितीशकुमार यांनी एनडीएच्या पाठिंबा घेत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी सुरु झालेलं बिहारी नाट्या अद्याप संपलेलं दिसत नाही. सध्या आलेल्या वृत्तानुसार, जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव वेगळी चुल मांडण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे संकेत जेडीयूचे माजी आमदार आणि शरद यादव यांचे निकटवर्तीय विजय वर्मा यांनी दिले आहेत.शरद यादव यांनी आपला स्वतच्या पक्षाची स्थापना केली तर बिहारमध्ये आणखी एक राजकीय भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.एबीपी न्यूजशी बोलताना विजय वर्मा यांनी शरद यादव महागठबंधनमध्ये राहण्यासाठी, जेडीयूतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना करु शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. विजय वर्मा म्हणाले की, सध्या शरद यादव जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात असून, बिहारमधील राजकीय परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा करत आहेत. ते सध्या नव्या पक्षाची स्थापना करण्यासाठी चाचपणी करत आहे. विशेष म्हणजे, शरद यादव यांचा धर्मनिरपेक्ष शक्तींच्या महागठबंधनामध्ये राहण्याकडे जास्त कल असल्याचा दावाही वर्मा यांनी केला आहे.शरद यादव यांनी यासाठी काँग्रेस नेते गुलाम नबी अझाद, आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येच्युरींना भेट घेतली आहे. शिवाय, एनडीए सरकारमध्ये सहभागी होऊन, मंत्रीपदाची शपथ घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचीही माहिती दिली. पण शरद यादव कुणाच्या संपर्कात आहेत, याबाबत विचारले असता, यावर अधिक खुलासा करण्याचं वर्मा यांनी टाळलं.दरम्यान, जेडीयूचे मुख्य महासचिव के.सी.त्यांगी या वृत्ताचं खंडण करुन, या सर्व अफवाह असल्याचं सांगितलं आहे. तर जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी शरद यादव नाराज असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.