शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

Bihar Election 2020: गलवान खोऱ्यात, पुलवामा हल्ल्यात तिरंग्यासाठी बिहारचे सुपुत्र शहीद झाले- पंतप्रधान मोदी 

By कुणाल गवाणकर | Updated: October 23, 2020 13:32 IST

Bihar Election 2020 PM Narendra Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभा सुरू; वातावरण तापलं

पाटणा: गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.'एनडीए सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं. आम्ही सत्तेत आलो तर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू, असं विरोधक म्हणतात आणि वर बिहारमध्ये येऊन इथल्या जनतेकडे मतं मागण्याची हिंमत करतात. हा बिहारमधील जनतेचा अपमान नाही का?', असा सवाल मोदींनी उपस्थित केला. बिहार आपल्या सुपुत्रांना देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवतो. पण कलम ३७० पुन्हा आणू म्हणून विरोधक त्या सुपुत्रांचा आणि बिहारचा अपमान करतात, असं मोदी म्हणाले.कधीकाळी बिहारवर सत्ता गाजवणाऱ्यांची नजर पुन्हा एकदा सरकारवर आहे. पण बिहार कुणामुळे मागे पडला, हे बिहारी जनतेनं विसरू नये. कोणाच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला, हे बिहारच्या जनतेनं लक्षात ठेवावं, असं आवाहन करत मोदींनी राष्ट्रीय जनता दलाला लक्ष केलं. यावेळी मोदींनी बिहार सरकार आणि जनतेनं कोरोनाविरुद्ध दिलेल्या लढ्याचं कौतुक केलं.मोदींनी त्यांच्या भाषणात दिवंगत माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना आदरांजली वाहिली. 'बिहारनं आपले दोन सुपुत्र गमावले. राम विलास पासवान यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि दलितांसाठी खर्ची घातलं. रघुवंश प्रसाद सिंह यांनीही आयुष्यभर गरिबांसाठी काम केलं. त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो,' अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला