शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांत मोठा स्पेक्ट्रम लिलाव २९ सप्टेंबरपासून

By admin | Updated: August 10, 2016 03:48 IST

भारत सरकार टेलिकॉम स्पेक्ट्रमचा आजवरचा सर्वात मोठा लिलाव येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू करणार असून, त्यात सात विविध बॅण्डचा स्पेक्ट्रम विकला जाणार आहे.

नवी दिल्ली : भारत सरकार टेलिकॉम स्पेक्ट्रमचा आजवरचा सर्वात मोठा लिलाव येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू करणार असून, त्यात सात विविध बॅण्डचा स्पेक्ट्रम विकला जाणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना हा जास्तीचा स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यावर सध्या ग्राहकांना सतावत असलेल्या ‘कॉल ड्रॉप’ आणि ब्रॉडबॅण्डचा धीमा वेग या अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा आहे.या स्पेक्ट्रम विक्रीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागविणारी नोटीस टेलिकॉम खात्याने जारी केली. या लिलावात एकूण २,३५५ मेगाहर्स्ट्स एवढा स्पेक्ट्रम विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. हा सर्व स्पेक्ट्रम त्यासाठी ठरविलेल्या राखीव किंमतीला विकला गेला तर त्यातून सरकारला ५.६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे टेलिकॉम सचिव जे. एस. दीपक यांनी सांगितले.७०० मेगाहर्स्ट््स, ८०० मेगाहर्स्ट््स, ९०० मेगाहर्स्ट््स, १८०० मेगाहर्स्ट््स, २१०० मेगाहर्स्ट््स, २३०० मेगाहर्स्ट््स आणि २५०० मेगाहर्स्ट््स अशा एकूण सात बॅण्डचा स्पेक्ट्रम यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असेल. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या लिलावात सरकारने १.१ लाख कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम विकला होता.अधिक चांगल्या सेवा देऊ शकणारा ७०० मेगाहर्स्ट्स बॅण्डचा स्पेक्ट्रम यावेळी प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी देशपातळीवर प्रति मेगाहर्स्ट्ससाठी ११,५०० कोटी रुपये अशी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे. ही राखीव किंमत खूपच जास्त आहे, अशी तक्रार भारती एअरटेल व व्होडाफोन यासारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी केली आहे. परंतु या किंमतीलाही या स्पेक्ट्रमला चांगली मागणी असेल, असा विश्वास व्यक्त करून दीपक म्हणाले की, हा तावून सुलाखून शुद्ध केलेल्या सोन्यासारखा उच्च दर्जाचा स्पेक्ट्रम असल्याने तो महाग आहे.हा लिलाव अधिक आकर्षक व्हावा, यासाठी सरकारने गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी अनेक नवे बदल केले आहेत, असे सांगून दीपक म्हणाले की, गेल्या वेळी ‘स्पेक्ट्रम युजेस चार्जेस’ ५ टक्के होते. यावेळी ते कमी करून ३ टक्के करण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)