शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

४० वर्षांतील सर्वात मोठी हानी

By admin | Updated: October 31, 2016 07:15 IST

ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले

रायपूर : ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले जाणे ही आपल्या संघटनेच्या ४० वर्षांच्या ‘क्रांतीकारी लढ्या’तील सर्वात मोठी हानी असल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेने दिली असून याच्या निषेधार्थ महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘बंद’ची हाक दिली आहे.स्वत:ला संघटनेचा मध्य क्षेत्राचा अधिकृत प्रवक्ता म्हणविणाऱ्या प्रताप नावाच्या व्यक्तीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, २४ आॅक्टोबरच्या सकाळी ओडिशात आमचे २७ सदस्य मारले गेले. गेली ४० वर्षे पक्षाने हाती घेतलेल्या क्रांतिकारी संघर्षातील ही सर्वात मोठी हानी होती. पक्षाचे आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ व तेलंगणमधील अनेक ज्येष्ठ नेते व सदस्य त्या कारवाईत मारले गेले. आमच्या सदस्यांना सरकारने कपटाने मारले व त्यासाठी शरण आलेल्या माओवाद्यांती मदत घेण्याचा दुनाच हातखंडा वापरला गेला.परंतु सरकारच्या अशा कपटी कारस्थानांनी पक्ष दुबळा न होता आमचा लढा यापुढेही सुरुच राहील, अशी वल्गना करताना या प्रसिद्धी पत्रकात असा आरोप केला गेला की, पोलिसांनी आमच्या ११ जखमी सदस्यांना पकडले व नंतर छळ करून त्यांना ठार केले. मोदी सरकार आणि राज्यांची सरकारे आदिवासी भागांमध्ये आक्रमकतेने खाणकामे हाती घेत आहे. पण अशा पिळवणुकीने लोकांमधील असंतोष वाढीला लागतो, याचा शासकांना विसर पडला असून याची त्यांना मोठी किंमत मोडावी लागेल, अशी धमकीही या पत्रकात देण्यात आली. (वृत्तसंस्था)>म्हणे, दडपशाही वाढलीयाआधीही अनेक वेळा असे मोठे आघात होऊनही आणि हजारो सदस्य गमावूनही आमच्या क्रांतिकारी लढ्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे, असा दावा करून पत्रक म्हणते की, आदिवासींच्या पिळवणुकीच्या विरोधात आमची संघटना नेहमीच उभी राहिली आहे. पण ‘आॅपरेशन ग्रीन हंट’चा तिसरा टप्पा हाती घेऊन केंद्र व राज्य सरकारे आमचा लढा चिरडून टाकू पाहात आहेत. (केंद्रीय गृहमंत्री) राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम व कोरापूटला भेट दिल्यानंतर सरकारी दडपशाही वाढली आहे.