शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एक मोठा गैरसमज : फेसबुक तुमचे सर्व फोटो डिलीट करणार

By admin | Updated: June 16, 2016 23:52 IST

जर सात जुलै पूर्वी मोमेंटस हे अ‍ॅप जर डाउनलोड केले नाही तर फेसबुक सर्व फोटो डिलीट करणार.

अनिल भापकर

सध्या फेसबुक युझर्सला एक फार मोठी चिंता सतावते आहे ती म्हणजे जर सात जुलै पूर्वी मोमेंटस हे अ‍ॅप जर डाउनलोड केले नाही तर फेसबुक सर्व फोटो डिलीट करणार. आपले फेसबुक वरील सर्व फोटो डिलीट होणार या भीतीने अनेक फेसबुक युझर्स ला ग्रासले आहे . अनेकांनी केवळ फोटो डिलीट होतील या भितीपोटी मोमेंटस हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. त्याला कारण सुद्धा तसेच आहे फेसबुक ने त्यांच्या युझर्स ला फोटो डिलीट करण्याची ताकीद दिली आहे. फेसबुक ने तसे इमेल त्यांच्या युझर्स ला पाठविले आहे. मात्र याविषयी सध्या फार गैरसमज पसरले आहेत. फेसबुक ने युझर्स ला पाठविलेले इमेल मध्ये सर्व फोटो डिलीट करणार असे म्हटलेले नाही तर फ़क़्त सिंक केलेले फोटोच डिलीट करणार असे म्हटलेले आहे. त्यामुळे तुमचे सर्व फेसबुक फोटो डिलीट होणार हे खरे नाही.

सिंक केलेले फोटो म्हणजे नेमके काय ?फेसबुक ने २०१२ मध्ये मोबाइल अ‍ॅप युझर्स साठी फोटो सिंक ही सुविधा सुरु केली होती .त्यामध्ये युझर्स ने त्यांच्या मोबाइल मधून काढलेले फोटो डायरेक्ट फेसबुक अकाउंट मध्ये अपलोड होण्याची ही सुविधा होती . त्यासाठी फेसबुक अ‍ॅप मध्ये सेटिंग मध्ये जाऊन सिंक फोटो ही सुविधा चालू करावी लागे. त्यानंतर तुमच्या मोबाईल द्वारे काढलेले फोटो फेसबुक अकाउंट ला आपोआप अपलोड होत अशी ही सुविधा होती . हे अपलोड झालेले फोटो फ़क़्त तुम्हीच पाहू शकत होता . नंतर फेसबुक वर जाउन कुठले फोटो मित्रांसोबत शेअर करायचे हे तुम्ही ठरवु शकत होता. हे मोबाइल वरून आपोआप अपलोड झालेले फोटो म्हणजे सिंक फोटो .मात्र यावर्षी जानेवारी पासून फेसबुक ने ही फोटो सिंकची सुविधा काढून घेतली आणि त्याएवजी मोमेंटस हे अ‍ॅप युझर्स च्या सेवेत आणले . तुम्ही मोमेंटस हे अ‍ॅप सात जुलै पर्यंत डाउनलोड केले नाही तर केवळ हे सिंक फोटोच डिलीट करण्याची ताकीद फेसबुक ने आपल्या युझर्स ला दिली आहे .जर तुम्हाला मोमेंटस हे अ‍ॅप वापरायचे नसेल तर तुम्ही सात जुलै पूर्वी तुमचे सिंक फोटो तुमच्या संगणकावर डाउनलोड करू शकता आणि जर तुम्ही फेसबुक ची फोटो सिंक ही सुविधाच ऑन केली नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही कारण तुम्ही अपलोड केलेले इतर सर्व फोटो फेसबुक वर जसेच्या तसे राहणार आहे.