शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

टॅब वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार : संजय निरुपम यांचा आरोप

By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठीचे टॅब घेताना निविदा प्रकरणाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले असून यात २३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. बाजारात अन्य कंपन्यांचे उच्च दर्जाचे टॅब उपलब्ध असताना केवळ व्हिडिओकॉन कंपनीचे महागडे टॅब चढ्या दरात घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ...


मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठीचे टॅब घेताना निविदा प्रकरणाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले असून यात २३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. बाजारात अन्य कंपन्यांचे उच्च दर्जाचे टॅब उपलब्ध असताना केवळ व्हिडिओकॉन कंपनीचे महागडे टॅब चढ्या दरात घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. महापालिका आयुक्तांनी ही निविदा रद्द करावी, अन्यथा या विरोधात केंद्रीय दक्षता आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पालिकेने यासाठी ग्लोबल निविदा मागवण्याची गरज होती मात्र शिवसेनेने व्हिडिओकॉनच्या टॅबची सेल्समनशीप केली व कालबा‘ टॅब खपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. महापालिकेच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी सध्या २२,७९९ टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. व्हिडिओकॉनचे मालक राजकुमार धूत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत त्यामुळे व्हिडिओकॉनला मदत पोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
कॉंग्रेस विद्यार्थ्यांना टॅब देण्याविरोधात नाही. मात्र त्याची योग्य पध्दत असायला हवी. मनमानी पध्दतीने मर्जीतील कंपनीला कंत्राट देणे अयोग्य आहे. महापालिका आयुक्त जर या घोटाळ्यात सहभागी नसतील तर त्यांनी त्वरित याची निविदा रद्द करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली. ३५००रुपयांना चांगल्या कंपनीचे टॅब मिळत असताना व्हिडिओकॉनचे टॅब ६८५० रुपयांना घेण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मेट्रो भाडेवाढीबाबतच्या निणर्याचा निरुपम यांनी निषेध केला. या निणर्याविरोधात राज्य सरकारने अपील करावे, अशी मागणी निरुपम यांनी केली. मेट्रो कायद्यामध्ये सुधारणा करावी व नागरिकांना न्याय द्यावा तसेच तिकीट दर कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा असे संजय निरुपम म्हणाले.