नवी दिल्ली : नव्या सरकारसमोर मंदीला रोखून नव्या रोजगारनिर्मितीचे आव्हान मोठे आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसमोर प्रमुख आव्हानांत जगातील सहाव्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या भारतात मंदीला रोखून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा समावेश आहे. याशिवाय खासगी गुंतवणूक वाढवून बँकांना बुडीत कर्जातून वाचवणे ही मोठी आव्हाने आहेत, असे अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एस अँड पी ग्लोबल रेंिटंग्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ (अशिया) शॉन रोश म्हणाले की, तात्कालिक आव्हान म्हणजे सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे केल्या गेलेल्या सुधारणांचा लाभ घेणे. विशेषत: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि दिवाळखोरी आणि शोधन अक्षमता संहितेला (आयबीसी) तर्कसंगत बनवणे होय. दुसरे मोठे आव्हान म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपत्तीची गुणवत्ता वाढवणे हे असेल.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र पंत यांनी सांगितले की, नव्या सरकारसमोरील आव्हान वाढीत झालेली घट थांबवून दीर्घकाळसाठी गैर मुद्रास्फीतिक वाढीचा दर वाढवण्याचे असेल. गेल्या वर्षी आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आर्थिक वृद्धी दर कमी होऊन पाच आठवड्यांत खालच्या पायरीवर (६.६ टक्के) आली आहे.