शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बिग बी जीएसटीचे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

By admin | Updated: June 20, 2017 11:50 IST

एसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20- जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर  म्हणून निवड केली आहे. 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे त्याआधी लोकांपर्यंत जीएसटी नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय या सगळ्या गोष्टी पोहचविण्यासाठी बिग बींची निवड करण्यात आली आहे. यासाठी खास तयार केलेला ४० सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
 
40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन जीएसटीचं महत्त्व सांगत आहेत तसंच जीएसटीचं महत्त्व सांगताना ते भारताच्या तिरंग्याचा दाखला देत आहेत. भारताच्या झेंड्यावर असणारे तीन रंग हे आपल्याला एकत्र बांधून ठेवतात त्याचप्रमाणे, जीएसटीमुळेही एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजारपेठ होणार असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे.  येत्या १ जुलैपासून जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करांच्या जागी फक्त जीएसटी हा एकच कर लागू होईल. याआधी जीएसटीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची निवड करण्यात आली होती
 
अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून विविध सामाजिक संदेश नेहमीच देत असतात. नो स्मोकिंगच्या कॅम्पेनपासून ते व्यायामापर्यंतचे प्रत्येक सल्ले ते नेहमीच त्याच्या चाहत्यांना देत असतात. लवकरच ते ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमातून एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत आमिर खान आणि दंगल फेम फातिमा सना शेखही विशेष भूमिकेत आहेत. तसंच अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ती एका नर्तिकेची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  विशेष म्हणजे या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरने सिनेमाबद्दल उत्सुकता आणखी वाढविली आहे.