शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडी भाजीमार्केटला विक्रेत्यांचा प्रतिसाद ओट्यांसाठी बोली : रात्री उशिरापर्यंत लिलाव प्रक्रिया

By admin | Updated: July 11, 2015 00:28 IST

नाशिक : आयुर्वेद महाविद्यालयासमोरील गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी महापालिकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लिलावात बोली बोलण्यासाठी महापालिकेत सकाळपासूनच विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरू होती.

नाशिक : आयुर्वेद महाविद्यालयासमोरील गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी महापालिकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लिलावात बोली बोलण्यासाठी महापालिकेत सकाळपासूनच विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरू होती.गोदाघाटावरील भाजीबाजार हटल्यानंतर महापालिकेने लगेचच गणेशवाडी भाजीमार्केटमधील लिलाव प्रक्रिया घोषित केली होती. त्यानुसार महापालिकेच्या रेकॉर्ड रुममध्ये ४६८ ओट्यांसाठी लिलाव प्रक्रियेला सकाळी ११ वाजेपासून सुरुवात करण्यात आली. उप आयुक्त रोहिदास बहिरम आणि पंचवटीचे विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांनी लिलावाची सूत्रे सांभाळली. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी सकाळपासूनच विक्रेत्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर भाजीपाल्यासाठी ३७९ ओटे, कांदा-बटाटासाठी ३७ ओटे, फळांसाठी ३७ ओटे आणि फळे, बेदाण्यासाठी १५ ओटे याकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. ए विंगमध्ये ४८ पैकी ३२ गाळे विक्रेत्यांना देण्यात आले होते. लिलावासाठी सरकारी दर १३७५ रुपये निश्चित करण्यात आला होता; मात्र १७२० रुपयांपर्यंत बोली गेल्याचे दिसून आले. एका व्यक्तीला एकच ओटा घेता येणार असल्याने रेकॉर्डरूम बाहेर विक्रेत्यांची मोठी गर्दी जमली होती. सदर ओट्यांसाठी मासिक भाडे आकारले जाणार असून तीन वर्षांसाठी ओटे देण्यात येणार आहेत. दरवर्षी भाड्यामध्ये १० टक्के भाडेवाढ केली जाणार असल्याचे उप आयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले.इन्फोगोदाघाटावरील विक्रेत्यांचा अल्प सहभागगोदाघाटावरील भाजीविक्रेत्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे स्वातंत्र्य गंगामाई भाजीविक्रेता संघटनेने दिले होते. त्यानुसार काही भाजीविक्रेतेही सहभागी होण्यासाठी गेले होते. परंतु जादा भाडे आणि ओट्यांचा कमी असलेला आकार यामुळे अनेकांनी सहभाग नोंदविला नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष शांताराम क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बैठक घेऊन भाजीबाजाराबाबत तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. फोटो - १० पीएचजेएल ६१महापालिकेने गणेशवाडी भाजीमार्केटमधील ओट्यांसाठी राबविलेल्या लिलाव प्रक्रियेला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अनामत रक्कम भरण्यासाठी विक्रेत्यांची लागलेली रांग.