भुजबळांच्या अटकेचा राष्ट्रवादीतर्फे निषेध
By admin | Updated: March 16, 2016 08:34 IST
जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेचा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे निषेध करण्यात येऊन या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.
भुजबळांच्या अटकेचा राष्ट्रवादीतर्फे निषेध
जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेचा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे निषेध करण्यात येऊन या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुजबळ यांच्यावरील कारवाई ही व्देषापोटी सूडबुद्धीने करण्यात आली आहे. तपास यंत्रणेस सर्वपरीने सहकार्य करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस, युवक कॉँग्रेस, किसान सेल, अल्पसंख्यांक सेल, महिला सेल, सेवादलातर्फे निषेध करण्यात आला. महानगर जिल्हाध्यक्ष परेश कोल्हे, कल्पना पाटील, महिला महानगर अध्यक्षा मिनल पाटील, विद्यार्थी शहर अध्यक्ष रिकु चौधरी, नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, डिंपल पाटील, सविता बोरसे, सोनाली देऊळकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.