शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांना भेटल्या पंकजा मुंडे

By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST

(सुधारित बातमी : या विषयी मा. विजय बाविस्कर सरांचे मा. संजीव साबडे सरांशी बोलणे झाले आहे. )

(सुधारित बातमी : या विषयी मा. विजय बाविस्कर सरांचे मा. संजीव साबडे सरांशी बोलणे झाले आहे. )

भुजबळ यांना भेटल्या पंकजा मुंडे

जे. जे. मध्ये जाऊन विचारपूस : राजकीय चर्चांना ऊत

मुंबई : आर्थर रोड जेलमधून उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली.
'भुजबळ यांच्याशी पहिल्यापासून माझे कौटुंबिक संबंध असल्याने मी त्यांची भेट घेतली,' असे पंकजा यांनी नंतर पत्रकरांना सांगितले. पंकजा यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे मोठे ओबीसी नेते होते. भुजबळ यांचीदेखील राष्ट्रवादीतील बडे ओबीसी नेते अशी ओळख आहे. वेगवेगळ्या पक्षांत असले, तरी मुंडे आणि भुजबळ यांचे घनिष्ठ संबंध होते. भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असल्याचे मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. मराठा समाजाच्या मोर्चांनी सध्याचे वातावरण ढवळून निघालेले असताना पंकजा यांनी भुजबळ यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उभयतांच्या भेटीवर सोशल मीडियात चर्चेला ऊत आला आहे. ही भेट राजकीय हेतूने प्रेरित आहे. युती सरकारच्या कारकिर्दीत भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई झाली. याच सरकारच्या जबाबदार मंत्री पंकजा भुजबळांना भेटतात, हे खटकणारे आहे. भुजबळ यांना अटक होऊन तब्बल ६ महिने लोटल्यानंतर युती सरकारच्या जबाबदार मंत्री पंकजा या त्यांना भेटण्यासाठीच आत्ताच का वेळ मिळाला, असे अनेक सवाल सोशल मीडियातील चर्चेत उपस्थित करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, पंकजा यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले भुजबळ यांची भेट घेतल्याने टीकेची झोड उठली आहे. पंकजा सुमारे २० मिनिटे भुजबळ यांच्याशी बोलल्या. या वेळी भुजबळ यांचे कुटुंबीय हजर होते. रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही पंकजा यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.(विशेष प्रतिनिधी)