शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ बंधूंची चौकशी होणार

By admin | Updated: February 18, 2015 02:04 IST

संबंधित कंपन्यांना ‘लाभ’ दिल्याप्रकरणी भुजबळ यांचे पुतणे समीर आणि पुत्र पंकज यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि अंमलबजाबवणी महासंचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे

महाराष्ट्र सदनाचा ‘लाभ’: समीर, पंकज यांची एसीबी-ईडीमार्फत चौकशीमुंबई : छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना ‘लाभ’ दिल्याप्रकरणी भुजबळ यांचे पुतणे समीर आणि पुत्र पंकज यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि अंमलबजाबवणी महासंचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष चौकशी पथक नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. भुजबळ यांच्या एमईटी या शिक्षण संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी या आधीच पूर्ण झाली आहे. आम्ही आधी समीर यांची आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनी पंकज यांची चौकशी करू, असे विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. समीर-पंकज बंधूंची चौकशी केवळ महाराष्ट्र सदन प्रकरणी नसेल. अन्य जवळपास १२ प्रकरणांमध्ये आम्हाला चौकशी करावी लागणार आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काही नामवंत कंपन्यांना बांधकाम विभागाने कंत्राटे दिली. या कंपन्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ पोहोचविला, असे आम आदमी पार्टीने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले होते. त्या दृष्टीने चौकशी केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)