शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआरकडून लवाद नियुक्तीची प्रक्रिया नवीन सॉफ्टवेअर निर्मिती : ठेवीच्या रकमेसाठी प्राधान्यक्रम

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेकडून कर्जदारांच्या विरोधात खटले चालविण्यासाठी लवादाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या पॅनलवर असलेल्या लवादाची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेकडून कर्जदारांच्या विरोधात खटले चालविण्यासाठी लवादाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या पॅनलवर असलेल्या लवादाची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकपदी जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी लेखापरीक्षणाच्या कामाला वेग दिला आहे.
नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती
बीएचआर पतसंस्थेतर्फे राज्यभरातील २३२ शाखा ऑन लाईन व्यवहार करण्यात आले होते. अवसायकांनी सर्व शाखांच्या लेखापरीक्षणाला प्राधान्य दिले आहे. बीएचआरतर्फे तयार करण्यात आलेल्या ऑन लाईन सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्याने अवसायकांकडून नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात येणार आहे. जुन्या सॉफ्टवेअरमधून एन्ट्री डिलीट होण्याचा धोका असल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लवाद नियुक्तीची प्रक्रिया सुरू
बीएचआर पतसंस्थेत कर्ज घेऊन त्याची परतफेड न करणार्‍या कर्जदारांविरोधात पतसंस्थेतर्फे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात धनादेश अनादरीतचे खटले न्यायालयात सुरु आहेत. बीएचआर पतसंस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा असल्याने या पतसंस्थेवर नियुक्त असलेल्या अवसायकांना लवाद नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. सहकार आयुक्तांच्या मंजुरीनंतर कर्जदारांविरोधात खटले चालविण्यासाठी लवकरच लवादाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाच्या पॅनलवर असलेल्या वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नवी पेठ किंवा मुख्य कार्यालयात लवादाचे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.

ठेवीदारांचा प्राधान्यक्रम ठरणार
बीएचआर पतसंस्थेकडून कर्जदारांकडून वसुलीला वेग देण्यात आला आहे. वसूल झालेल्या रकमेतून ठेवीदारांना रकमा वाटप करण्यात येणार आहे. वैद्यकीय उपचारासाठी ठेवीदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सुरुवातीला एकूण ठेवीच्या ३० टक्के रकम देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर वसुली वाढल्यानंतर उर्वरित ७० टक्के ठेवींची रक्कम परत करण्यात येणार आहे.