बीएचआरचे लवाद पूर्णवादमुळे अडचणीत पुढील कामकाजाबाबत संभ्रम : नियुक्तीपूर्वी राजीनामा दिल्याचा दावा
By admin | Updated: May 19, 2016 00:44 IST
जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या कर्जप्रकरणांच्या निपटार्यासाठी लवाद म्हणून नियुक्त केलेले ॲड.उदय कुलकर्णी यांच्यावर पूर्णवाद पतसंस्थेतील फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने नियुक्तीबाबत अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान,कुलकर्णी यांनी आपण पूर्णवाद पतसंस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.
बीएचआरचे लवाद पूर्णवादमुळे अडचणीत पुढील कामकाजाबाबत संभ्रम : नियुक्तीपूर्वी राजीनामा दिल्याचा दावा
जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या कर्जप्रकरणांच्या निपटार्यासाठी लवाद म्हणून नियुक्त केलेले ॲड.उदय कुलकर्णी यांच्यावर पूर्णवाद पतसंस्थेतील फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने नियुक्तीबाबत अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान,कुलकर्णी यांनी आपण पूर्णवाद पतसंस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.काय आहे पूर्णवाद पतसंस्थेचा गुन्हाडॉ.सुशील मंत्री व डॉ.पूनम सुशील मंत्री या डॉक्टर दाम्पत्याच्या मुदत ठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतरही न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनसह संचालक मंडळातील १३ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीत संचालक ॲड.उदय कुलकर्णी यांना आरोपी करण्यात आले आहे.१ एप्रिल रोजी लवाद म्हणून नियुक्तीबीएचआर पतसंस्थेवर सष्टेंबर महिन्यात अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या कर्जदारांविरुद्ध चालविण्यात येणार्या खटल्यांवर निर्णय देण्यासाठी कंडारे यांनी सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी लवाद नियुक्तीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार ॲड.उदय कुलकर्णी यांची १ एप्रिल रोजी नियुक्ती झाली होती.लवादाला न्यायनिर्णय देण्याचे अधिकारसहकार आयुक्तांनी लवादाची नियुक्ती केल्यानंतर कर्जदार आणि पतसंस्था या दोघांचे म्हणणे ऐकून घेत लवाद त्याच्यावर निर्णय देत असतात. पूर्णवाद पतसंस्थेच्या ठेवीच्या रकमेत फसवणुक केल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले ॲड.उदय कुलकर्णी हे ठेवीदार किंवा कर्जदार यांना कितपत न्याय देतील हा प्रश्न निर्माण होत आहे.२१ मार्च रोजी संचालकपदाचा राजीनामाॲड.उदय कुलकर्णी हे २००७ पासून पूर्णवाद पतसंस्थेचे विधी सल्लागार म्हणून काम पाहत होते. दरम्यान २०११ मध्ये संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. त्यात संचालक म्हणून ॲड.उदय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेेचे विधी सल्लागार असल्याने संचालक राहू शकत नाही ही बाब लक्षात घेत ॲड.कुलकर्णी यांनी संचालकपदावरून कमी करावे असे अर्ज दिले आहेत. तसेच २१ मार्च रोजी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.