भिवापूर.. लाईनमन मृत्यू
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
विद्युत खांबावरून पडल्याने लाईनमनचा मृत्यू
भिवापूर.. लाईनमन मृत्यू
विद्युत खांबावरून पडल्याने लाईनमनचा मृत्यूसावरगाव येथील घटना : वादळामुळे वीजपुरवठा खंडितभिवापूर : बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत खांबावर चढलेल्या लाईनमनचा तोल गेल्याने तो खाली पडला. यात गंभीर दुखापत झाल्याने लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील सावरगाव येथे बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.फत्तू वातूजी बागडे (५७, रा. भिवापूर) असे मृत लाईनमनचे नाव आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यात सोसाट्याच्या वादळासह पावसाने हजेरी लावली. तडाख्याच्या वादळामुळे अनेक ठिकाणच्या विद्युत तारा लोंबकळल्याने विद्युत पुरवठा बंद झाला होता. दरम्यान, वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती कामे सुरू केली. तालुक्यातील सावरगाव येथे दुरुस्ती कामे करण्यासाठी फत्तू बागडे हे वीज खांबावर चढले होते. दरम्यान, त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सदर लाईनमनचा खांबावरून पडल्याने मृत्यू झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज असला तरी शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. यासंदर्भात वीज कंपनीचे अभियंता अजय कोलते यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)