शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भारिप बमसंने पंचायत समितीचा गड राखला

By admin | Updated: June 28, 2016 19:30 IST

विरोधकांकडे ७ सदस्य असले तरी महाआघाडी होण्यास राजकीय पक्षातील गटबाजी कारणीभूत.

बाळापूर : बाळापूर पंचायत समिती सभागृहात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारिप बमसं पक्ष आहे. विरोधकांकडे ७ सदस्य असले तरी महाआघाडी होण्यास राजकीय पक्षातील गटबाजी कारणीभूत आहे. त्यामुळे काठावर बहुमत असलेला भारिपने पंचायत समितीचा गड इतर पक्षातील गटबाजीने राखला.भारिप बमसंचे रिमोट पक्ष सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बमसंच्या सातही सदस्यांना लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन भारिप बमसं व इतर पक्षातील मते खेचणार्‍या उमेदवाराला सभापती पदाची संधी दिली. मागील वेळी भारिप बमसंने काँग्रेसचा उमेदवार फोडून त्याला सभापती केले होते. यावेळी काँग्रेसचे तीनही उमेदवार उपसभापती पदाचे बाशिंग बांधून होते. त्यामुळे भारिप बमसंचला आयतीच संधी भेटली. त्यामुळे भारिप बमसंच्या विरोधात कुणीही पुढाकार घेतला नाही. भाजप व काँग्रेसजवळ सभापतीचा उमेदवार नव्हता. एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभाताई दादाराव लोड या उमेदवार होत्या. परंतु संख्याबळ व काँग्रेसच्या सदस्यात उपसभापतीचे खूळ असल्याने त्यांनी सभापतीपदी नामांकन दाखल केले नाही. भारिप बमसंवजळ सभापती पदाचे दोन सशक्त दावेदार होते. धनगर समाजाच्या मंगला तितूर व कुणबी समाजाच्या नंदा जनार्धन साबळे या होत्या. परंतु पक्ष आदेशाने त्यांनी माघार घेतली. परंतु भारिप बमसंचने कुणबी समाजाला संधी न दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अद्यापही भारिप बमसंने सभापतीपदी कुणबी समाजाला संधी दिली नाही. उलट धनगर समाजाला दुसर्‍यांदा संधी मिळाली. वेळेवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने नंदा साबळेंना सभापती पदासाठी समर्थ देण्यसाठी पुढाकार घेतला. परंतु पक्ष आदेश असल्याने आदेशाचे पालन केले, असे नंदा साबळे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे ३ सदस्य उपसभापती पदासाठी भारिप बमसंसमोर लोटांगण घेत होते. कुणाला संधी मिळते, याची वाटपाहत असताना काँग्रेसच्या अनिताबी शे. फिरोज, माजी उपसभापती प्रशांत मानकर व विजय ढाकरे यांनी उपसभापती पदासाठी नामांकन भरले. ही संधी साधण्यासाठी भारिप बमसंजवळ ७ सदस्य असल्याने विरोधकातील फुअीचा फायदा उचलण्यासाठी भारिप बमसंचे नामदेव मास्कर यांनी नामांकन दाखल केले. भाजपच्यावतीने शकुंतला वानखडे यांनी नामांकन दाखल केले.