शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड निर्मितीसाठी झटलेला नेता आज विकतोय भाजीपाला

By admin | Updated: February 6, 2017 00:49 IST

झारखंड हे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी १९८० ते १९९० या दशकात आघाडीवर राहून चळवळ करून बंद आणि निदर्शने या दरम्यान अनेकवेळा तुरुंगात गेलेले विनोद भगत

रांची : झारखंड हे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी १९८० ते १९९० या दशकात आघाडीवर राहून चळवळ करून बंद आणि निदर्शने या दरम्यान अनेकवेळा तुरुंगात गेलेले विनोद भगत (५५) आज मोरहाबदी येथे रस्त्यावर भाजी विकून पोट भरत आहेत. चळवळ आणि आंदोलनानंतर बिहार राज्यातून झारखंड वेगळे काढून त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला गेला त्याला आता १७ वर्षे झाली. विनोद भगत हे अखिल झारखंड स्टुडंट्स युनियनचे संस्थापक सदस्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये जसा चहा विकावा लागला तसे मी मोरहाबदी गावात आंत्यतिक दारिद्र्यामुळे भाजी विकत आहे, असे भगत यांनी सांगितले. माझ्या आयुष्यातील हा वाईट काळ असून तो लवकरच निघून जाईल, अशी त्यांना आशा आहे.झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्यासाठी १९८६ मध्ये मी माझी नोकरी सोडून चळवळीत सक्रिय झालो. राज्य मग लबाड, लुच्च्या लोकांच्या हाती जाईल याची मला तेव्हा कल्पना नव्हती, अशी खंत बिनोद भगत यांनी बोलून दाखवली. १९९५ मध्ये स्थापन झालेल्या झारखंड भाग स्वायत्त परिषदेचे विनोद भगत हेदेखील सदस्य होते. भगत यांनी रांची विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये दोन दोन पदव्या मिळवलेल्या आहेत. नंतर ते दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये धनबादला असिस्टंट स्टेशन मॅनेजर होते. त्यांना राजकीय (झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजप) पक्षांशी जुळवून न घेता आल्यामुळे ते मग विस्मृतीमध्ये गेले.