शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रपतीपदासाठी भागवत उमेदवार नाहीत’

By admin | Updated: May 22, 2017 04:25 IST

भाजपने राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार अद्याप ठरविलेला नाही. तसेच पक्षाने सरसंघचालक मोहन भागवत यांना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपने राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार अद्याप ठरविलेला नाही. तसेच पक्षाने सरसंघचालक मोहन भागवत यांना सत्ताधारी आघाडीचे उमेदवार बनविण्याचा शिवसेनेचा प्रस्तावही अमान्य केला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा म्हणाले की, भागवत यांना उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव पक्षाने अमान्य करताना खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वीच हा प्रस्ताव फेटाळला आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपप्रणीत रालोआ उमेदवाराविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शहा यांनी याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले. जर माझ्या मनात एखादे नाव असले तरीही मी याबाबत आधी पक्षात चर्चा करेन, असे ते म्हणाले. भाजपाचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सरसंघचालक भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार ठरतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र भाजपाचा भागवत यांना उमेदवारी देण्याचा विचार नाही, हे शहा यांच्या या विधानावरून स्पष्ट झाले.रजनीकांत यांनी राजकारण प्रवेश करण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू असून रजनीकांत यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट घडविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. सूूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत हे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ शकतात. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाबाबत निर्णय होऊ शकतो.रजनीकांत मोदींना भेटणार?तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी भाजपामध्ये यायचे ठरविले तर त्यांचे केव्हाही स्वागतच होईल, असे सूचक विधान अमित शहा यांनी केले. मात्र राजकारणात यायचे की नाही याचा निर्णय आधी रजनीकांत यांनी स्वत: घ्यायला हवा, असे ते म्हणाले.