शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

भागवतांना सत्य माहित्येय, पण...; चीनबद्दलच्या विधानावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

By कुणाल गवाणकर | Updated: October 25, 2020 15:33 IST

मोहन भागवतांच्या विधानावर राहुल गांधींची सडकून टीका

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या चीनबद्दलच्या विधानाचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी समाचार घेतला आहे. मोहन भागवत यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण त्यांना या गोष्टीचा सामना करण्याची भीती वाटते. चीननं आपल्या जमिनीवर कब्जा केला हे सत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले. विजयादशमीच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित करताना चीनवर भाष्य केलं. चीननं भारतीय हद्दीत कशाप्रकारे घुसखोरी केली आणि आजही त्यांच्याकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत, हे आता जगाला स्पष्टपणे समजलं आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेची सगळ्यांना कल्पना आहे. चीन एकाच वेळी तैवान, व्हिएतनाम, अमेरिका, जपानसह अनेक देशांशी लढत आहे. मात्र भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानं चीनला धक्का बसला आहे, असं भागवत यांनी म्हटलं आहे.सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर राहुल गांधींनी शरसंधान साधलं. 'भागवत यांना सत्य माहिती आहे. मात्र ते सत्याचा सामना करण्यास घाबरतात. चीननं भारताची जमीन बळकावली हे सत्य आहे. भारत सरकार आणि आरएसएसनं याला परवानगी दिली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.काय म्हणाले होते मोहन भागवत?कोरोनाच्या महामारीसंदर्भात चीनची भूमिका संशयास्पद राहिली हे तर म्हटलेच जाऊ शकते, मात्र स्वतःच्या आर्थिक, सामरिक बळामुळे उन्मत्त होऊन भारताच्या सीमांवर ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाला आहे. भारताचे शासन, प्रशासन, सैन्य तसेच जनतेने या आक्रमणासमोर उभे राहून आपला स्वाभिमान, दृढनिश्चय व शौर्याचा उज्वल परिचय दिला आहे. यामुळे चीनला अनपेक्षित धक्का मिळाल्याचे वाटत आहे. या परिस्थितीत आपल्याला सावध होऊन दृढ व्हावे लागेल. चीनने याअगोदरदेखील वेळोवेळी जगाला आपल्या विस्तारवादी मनोवृत्तीची ओळख दिली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे. या दिशेने आपल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची पावलेदेखील पडत आहेत, असे दिसून येते. श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ हे आपले शेजारी देश, जे आपले मित्रदेखील आहेत व मोठ्या प्रमाणात समान प्रकृतीचे देश आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला आणखी मित्रत्वाचे संबंध करण्याबाबत वेग वाढविला पाहिजे. या कार्यात अडथळे उत्पन करणारे मतभेत, मतांतरे, वाद इत्यादी मुद्दे त्वरित दूर करण्याचे आणखी प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवत