शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भागवत हेच मोदी सरकारचे ‘बॉस’

By admin | Updated: September 3, 2015 22:13 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे खरे ‘बॉस’ आहेत, असे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे खरे ‘बॉस’ आहेत, असे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार हे भारतीय कॉर्पोरेट आणि रा. स्व. संघाच्या हातातील बाहुले आहे, असा आरोप करून तिवारी यांनी संघ-भाजपा समन्वय बैठकीवर हल्लाबोल केला.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असतील, पण खरे बॉस मात्र मोहन भागवत हेच आहेत. मोदी सरकार हे दोन तारांवर नाचणाऱ्या बाहुल्यासारखे आहे. एक तार रा. स्व. संघाद्वारे नियंत्रित केली जाणारी सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक तार आहे तर दुसरी भारताच्या कॉर्पोरेटद्वारे नियंत्रित केली जाणारी आर्थिक तार आहे. एकप्रकारे मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल संघाच्या हातात आहे. मोदी केवळ बाहुले बनून काम करीत आहेत. भागवत हेच सत्ताकेंद्र आहेत आणि सत्तेच्या सर्व शक्ती त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळेच सरकारचे बडे मंत्री सरसंघचालकांना रिपोर्ट करीत आहेत, असे तिवारी म्हणाले. दरम्यान, मोदी मंत्रिमंडळातील सदस्य रा.स्व. संघाच्या बड्या नेत्यांसमोर आपापले रिपोर्ट कार्ड सादर करीत आहेत. त्यामुळे आपण देशाच्या जनतेप्रती जबाबदार आहोत की संघाप्रती हे मोदी सरकारने स्पष्ट केले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते आर.पी. एन. सिंग यांनी म्हटले आहे.