बैसवारे खून प्रकरण
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
बैसवारे खून प्रकरण आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढनागपूर : बॉडीबिल्डर रितेश बैसवारे खूनप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाचही आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या आरोपींपैकी पुरंदर ऊर्फ पाजी यादव, अश्विन तुरकेल, निखील डागोर आणि संदीप महतो यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात ...
बैसवारे खून प्रकरण
बैसवारे खून प्रकरण आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढनागपूर : बॉडीबिल्डर रितेश बैसवारे खूनप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाचही आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या आरोपींपैकी पुरंदर ऊर्फ पाजी यादव, अश्विन तुरकेल, निखील डागोर आणि संदीप महतो यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली तर काल अटक करण्यात आलेल्या आशिष ऊर्फ मामा रामभाऊ गायकवाड याला नव्याने पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आला. आज या सर्व आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुरख्यांमध्ये न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्यावतीने या प्रकरणात भादंविच्या १२० ब (फौजदारी कट) आणि शस्त्र कायद्याच्या कलमान्वये गुन्हे वाढविण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या प्रकरणात आणखी दोन आरोपी आशिष बघेल आणि कालू यांना अटक करावयाची असून या आरोपींच्या मदतीनेच त्यांना अटक केली जाऊ शकते. त्यामुळे आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाकडून न्यायालयाला करण्यात आली. बचाव पक्षाकडून मात्र पोलीस कोठडीस विरोध करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. १३ जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील स्वप्निल रजनी अपार्टमेंटस्थित एसबीआय एटीएमसमोर भररस्त्यावर आमदार निवासमागील रहिवासी रितेश रमेश बैसवारे याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून , चाकू व सुरीने अनेक वार करून खून करण्यात आला होता. न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील विजयालक्ष्मी अडगोकर तर आरोपींच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले.