शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भारतात समलैंगिक संबंधांना मिळणार मान्यता ?

By admin | Updated: June 30, 2015 11:59 IST

भारतात समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाारा भारतीय दंड विधानातील कलम ३७७ रद्द होऊ शकतो असे संकेत कायदामंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरु, दि. ३० -भारतात सम लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाारा भारतीय दंड विधानातील कलम ३७७ रद्द होऊ शकतो असे संकेत कायदामंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे. समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याच्या कायद्यावरही विचारविनिमय होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेत समलैंगिक विवाहांना संमती देणारा कायदा मंजूर झाल्यावर भारतानेही यावर विचार करावा अशी मागणी समलिंगींसाठी काम करणा-या संस्थांकडून होत होती. सोशल मिडीयावरही अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. याविषयी कायदामंत्री सदानंद गौडा यांना प्रश्न विचारला असता गौडा म्हणाले, अमेरिकेनंतर भारतातही अनेक जण याचे समर्थन करत आहेत. आम्ही सर्वबाजूंनी सखोल विचार केल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. राज्यसभेत डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांनी ट्रान्सजेंडर्सच्या हक्कासंदर्भात एक विधेयक मांडले आहे, हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून लोकसभेतही विधेयक मंजूर झाल्यास कलम ३७७ चे महत्त्व उरणार नाही असेही गौडा यांनी सांगितले. 

भारतीय दंड विधानातील कलम ३७७ नुसार अनैसिर्गक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याने देशात समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरतो. हा कलम रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. गौडा हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातून संसदेत निवडून आले असून संघाचा या जिल्ह्यावर चांगलाच प्रभाव आहे. संघाने समलिंगी संबंधांना नेहमीच कडाडून विरोध केला असतानाच गौडा यांनी मांडलेले मत हे महत्त्वाचे ठरते असे जाणकारांचे म्हणणे आहे.