बेलोना....
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव
बेलोना....
जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सवबेलोना येथे आयोजन : विविध १४ आश्रमशाळांचा सहभागबेलोना : विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. स्थानिक मातोश्री सुमनताई आश्रमशाळेत पार पडलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात विविध आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविले.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त ए.डी. आत्राम होते. याप्रसंगी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, राजाभाऊ सातपुते, सरपंच कीर्ती पराते, उपसरपंच ललित काळमेघ यांची उपस्थिती होती.तीन दिवसीय कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध १४ आश्रमशाळांनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लोकनृत्य स्पर्धेत वाघदरा येथील आश्रमशाळेने प्रथम, तर बेलोना आश्रमशाळेने द्वितीय पुरस्कार पटकावला. इतर शाळांच्या चमूंना प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले. महोत्सवाच्या आयोजनासाठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)